शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘दस लाख रूपये दे, नही तो बच्चे का मर्डर’ - जळगावात महिलेला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:09 IST

जळगाव : खासगी बॅँकेत नोकरीला असलेल्या सुनंदा जालम चौधरी (वय ५२, रा.द्रौपदी नगर, जळगाव ) यांचे घर व दुचाकी ...

जळगाव : खासगी बॅँकेत नोकरीला असलेल्या सुनंदा जालम चौधरी (वय ५२, रा.द्रौपदी नगर, जळगाव) यांचे घर व दुचाकी जाळल्यानंतर आता पुन्हा त्यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर कॉल करुन १० लाखासाठी मुलाचा खून करण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी व बुधवारी घडला. तसेच एका अनोळखी व्यक्तीनेही बॅँकेत येवून चौकशीही केली. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल रेकॉर्डींग त्यांनी पोलिसांकडे सादर केले.घर जाळण्याचाही केला होता प्रयत्नया प्रकारामुळे चौधरी कुटुंब दहशतीखाली असून संबंधित व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी चौधरी यांनी यांनी केली आहे. याआधी १० नोव्हेंबरच्या रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चौधरी यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात दुचाकी, सोफासेट व खुर्ची जळून खाक झाली होती. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून दोघांनी हे कृत्य केल्याचा संशय चौधरी यांनी व्यक्त केला होता. तेव्हाही दुचाकीवरुन आलेले दोन्ही चोरटे घराच्या परिसरात येताना व दुचाकीवर पेट्रोल टाकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल होऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही.सुपारी दिल्याचा संशय...सोमवारी मोबाईलवर संपर्क केलेल्या व्यक्तीने स्वत:चे नाव दिलीप चौधरी असे सांगून ‘अनिल चौधरी इनके दस लाख रुपये दे, नही तो बच्चे का मर्डर करुंगा‘ अशी धमकी दिली.भावना यांचाही काही व्यवहार आहे. या दोघांचे पैसे तातडीने द्यावे, अशी धमकी या व्यक्तीने फोनवरुन दिली. ही व्यक्ती हिंदी भाषीक आहे. कल्याण येथून बोलत असल्याचे तो सांगत आहे. सुपारी देऊन हा प्रकार घडवून आणला जात असल्याचा संशय आहे. घाबरलेल्या चौधरी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्याकडेही रेकॉर्डींग व सीसीटीव्ही फुटेज दिले.कॉल डिटेल्स मागविलेया प्रकरणात तपासाधिकारी मनोज वाघमारे यांना विचारले असता मोबाईलवरील धमकीच्या संदर्भात संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद येत आहे. त्यामुळे त्या क्रमांकाचे कॉल डिटेल्स मागविण्यात आले आहेत. त्यानंतरच ती व्यक्ती कोण व कुठून बोलत होती, हे स्पष्ट होईल, असे वाघमारे यांनी सांगितले. याआधी दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयितांना अद्याप अटक झालेली नसल्याचेही वाघमारे यांनी सांगितले. न्याय मिळावा म्हणून सुनंदा चौधरी या गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांची भेट घेणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव