शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:31+5:302021-05-10T04:16:31+5:30

जळगाव - गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व प्रकारच्या बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून , शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या ...

Give financial package to farmers | शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्या

शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्या

Next

जळगाव - गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व प्रकारच्या बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून , शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसून, शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल विकावा लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषक समाजाने केली आहे. या मागणीसाठी राज्य शासनाला देखील निवेदन देण्यात आले आहे.

स्थायी समिती सभापतींची डी.बी.जैन रुग्णालयाला भेट

जळगाव - मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी रविवारी शिवाजीनगर भागातील डीबी जैन रुग्णालय येथे भेट देऊन लसीकरण केंद्राची पाहणी केली. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून लसीकरण घेतल्यास यामुळे कोरोना पासून देखील बचाव होऊ शकतो. याबाबत वैद्यकीय विभागाने लक्ष देण्याची सूचना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Give financial package to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.