शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मुलींमध्ये संयमाचा संस्कार आईने रुजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:09 IST

स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. म्हणूनच स्त्रियांनी आपसात संवाद ठेवला तर कुटुंंबाची वीण घट्ट राहू शकते. मुलींमध्ये आईने जाणीवपूर्वक संयमाचा संस्कारदेखील रुजवणे गरजेचे आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेच दर्शविते. वयोवृद्धांना पोटगी मिळविण्यासाठी न्यायालयात यावे लागते. हे आपल्या ढासळत्या कुटुंब व्यवस्थेचे लक्षण असल्याचे उद्बोधन न्यायाधिश अनिता गिरडकर यांनी केले.

ठळक मुद्देन्यायाधिश अनिता गिडकर यांचे उद्बोधनचाळीसगावात वाणी महिला मंडळाचे आयोजनआदर्श माता गौरव सोहळा८०० कुटुंबांची परिचय पुस्तिका

चाळीसगाव, जि.जळगाव : स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. म्हणूनच स्त्रियांनी आपसात संवाद ठेवला तर कुटुंंबाची वीण घट्ट राहू शकते. मुलींमध्ये आईने जाणीवपूर्वक संयमाचा संस्कारदेखील रुजवणे गरजेचे आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेच दर्शविते. वयोवृद्धांना पोटगी मिळविण्यासाठी न्यायालयात यावे लागते. हे आपल्या ढासळत्या कुटुंब व्यवस्थेचे लक्षण असल्याचे उद्बोधन न्यायाधिश अनिता गिरडकर यांनी येथे केले.गुरुवारी सायंकाळी त्यांच्या अध्यक्षतेखाली लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित एकता समाजदर्शिका प्रकाशन व आदर्श माता गौरव सोहळा वाणी समाज मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपिठावर प्रा.उषा बागड, रेखा अमृतकार, जयश्री अमृतकार यांच्यासह पंचकमिटीच्या प्रमुख वत्सला केशव कोतकर, सुलभा अमृतकार, मालती पाटे, अंजली येवले आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना न्यायाधिश गिरडकर यांनी भारतीय कुटुंब पद्धतीसमोरील नव्याने उभ्या राहिलेल्या आव्हानांचा मागोवा घेतला. वयोवृद्ध व्यक्तिंना अखेरच्या दिवसात जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांचा सांभाळ व्हावा. यासाठी न्यायालयाला कायदेशीर लढाई लढावी लागते. आई-वडिलांचा सांभाळ करणे हे मुलांचे कर्तव्यच आहे. यापुढे आदर्श सासू, स्मार्ट सुनबाई यांचाही गौरव झाला पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.प्रास्ताविकात वत्सला कोतकर यांनी एकता समाजदर्शिका कशी घडली याचा प्रवास मांडला. कुटुंबाचे पाठबळ असल्यामुळेच ४५ दिवसात ८०० कुटुंबांचा परिचय या पुस्तिकेत संकलित करता आल्याचेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले.यावेळी उद्योगपती केशव कोतकर, आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोतकर, बाजार समितीचे संचालक जितेंद्र वाणी, वाणी समाजाचे अध्यक्ष शरद मोराणकर, सचीव सी.सी.वाणी, भूषण ब्राह्मणकार, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कामिनी अमृतकार व डॉ.शुभांगी कोतकर यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्सव समितीतील कल्पना पाखले, माधुरी वाणी, मीना कुडे, आशालता पिंगळे, कल्पना राणे, वैशाली शिरोडे, वैशाली अमृतकार, वर्षा पिंगळे यांनी परिश्रम घेतले.आदर्श मातांचा गौरवभारतीय नाविक दलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल सुनील भोकरे यांच्या आई इंदू भोकरे, नासागर्ल स्वीटी पाटे हिच्या आई ज्योती पाटे आणि चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्या आई कमल कोतकर यांचा आदर्श माता म्हणून करण्यात गौरव करण्यात आला. नगरसेविका योगिनी भूषण ब्राह्मणकार यांना सामाजिक बांधिलकीसाठी गौरविण्यात आले. मानपत्राचे शब्दांकन जिजाबराव वाघ यांनी केले होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव