रावेर : आईच्या अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या मुलीला रस्त्याच मृत्यूने गाठल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता रावेर- बऱ्हाणपूर रोडवर भोकरी शिवारात घडली. तुळसाबाई बाबुराव धांडे ( ९०, रा. खानापूर ता. रावेर) यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झाले. आईच्या मृत्यूचा निरोप मिळताच आशा प्रेमचंद चौधरी (६१, रा. मस्कावद सीम, ता. रावेर) ह्या मुलगा भरतसोबत मोटारसायकलने खानापूरकडे निघाल्या. वाटेत बर्हाणपूर रस्त्यावर मोठ्या खड्डयात मोटारसायकल आदळली. त्यात आशा ह्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या.
आईच्या अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या मुलीला मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 23:41 IST