शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 16:10 IST

शिरसोली रस्त्यावर झालेल्या अपघातात एक विद्यार्थिनी गंभीर जखमी

ठळक मुद्देभरधाव ट्रॅक्टरने दिली दुचाकीला धडकएक विद्यार्थीनी ठार तर दुसरी गंभीर जखमीमयत करूणाच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोष

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १ : महाविद्यालयातून सुटी झाल्यानंतर घरी येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने करुणा रेनॉल्ड लवणका (वय १८, रा.महाबळ, जळगाव) ही डिप्लोमाची विद्यार्थिनी ठार झाली तर साक्षी राजेंद्र नारखेडे (वय १७ रा.समर्थ कॉलनी, जळगाव) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. साक्षी हिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता शिरसोली रस्त्यावरील हाजी मलंगशहा बाबा दर्गाजवळ झाला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, करुणा लवणका व साक्षी नारखेडे या दोन्ही विद्यार्थिनी शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होत्या. गुरुवारी महाविद्यालयातून सुटी झाल्यानंतर दोघी विद्यार्थिनी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एच.३०७८) घरी येत असताना दर्गाजवळ उताराकडून भरधाव वेगाने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर येत होते. या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने करुणा व साक्षी दोन्ही लांब फेकल्या गेल्या. करुणा हिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर या विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी करुणाला मृत घोषीत केले तर साक्षीला तेथून खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात