शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापूर्वी मुलीला पळविले, रेखाचित्र झाले आता तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:44 IST

रेल्वे स्थानकावरील घटना : संशयित व बालिका सीसीटीव्हीत कैद

जळगाव : जयपूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याला डुलकी लागल्याचे पाहून एका संशयिताने खाऊ देण्याच्या बहाण्याने पाच वर्षाच्या बालिकेला पळविल्याचा प्रकार रेल्वे स्थानकावर एक वर्षानंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित व बालिका दोघंही सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेले असून संशयित हा गोवा एक्सप्रेसमध्ये बालिकेला घेऊन गेल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०१९ रोजी दुपारी १२.४५ वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपूर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली. याच दरम्यान, संशयिताने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलविले. यानंतर तिला सोबत घेवून संशयित गोवा एक्सप्रेसमध्ये बसून रवाना झाला. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. वर्ष उलटूनही मुलीचा शोध लागू शकलेला नाही. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातील चिमुकलीला घेवून जाणारा संशयित दिसून येत आहे. त्याचे छायाचित्र तसेच रेखाचित्र जारी केले आहे.चिमुकलीसह संशयिताचे वर्णन असेअपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तीची उंची २ फूट ३ इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणाºया संशयिताचेही फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित ३५ ते ४० वयोगटातील आहे. त्यांची उंची ५ ते ६ फूट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. हा संशयित अथवा चिमुकलीबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव