शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील बालिका अत्याचार व खून प्रकरणात आदेशबाबा दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:08 IST

जळगाव : समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी  सोमवार दि, २५ रोजी दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे समता नगरातील घटना २७ रोजी शिक्षेची सुनावणी

 

जळगाव : समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी  सोमवार दि, २५ रोजी दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.खटल्याचा निकाल लागणार असल्याने आदेशबाबाला सकाळी ११ वाजताच न्यायालयात आणण्यात आले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी पीडितेची आई तथा मुळ फिर्यादी, अखिल भारतीय सफाई कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण चांगरे यांच्यासह नातेवाईक मोठ्या संख्येने न्यायालयात थांबून होते.दोन मिनिटात ठरविले दोषीदुपारी तीन वाजता कामकाज होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार तीन वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी आदेशबाबाला हजर करण्याचे आदेश दिले. दोन मिनिटातच न्यायालयाने आदेशबाबा याला सर्व दाखल कलमाखाली दोषी ठरविल्याचे जाहीर करुन शिक्षा २७ रोजी सनावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आदेशबाबाला बाहेर काढण्यात आले.

काय आहे प्रकरणसमता नगरातील ९ वर्षीय बालिका १२ जून २०१८ रोजी सायंकाळी घरातून गायब झाली होती. त्यानंतर १३ रोजी पहाटे सहा वाजता घरासमोरच टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेह आढळून आला होता. बालिका बेपत्ता झाल्यानंतर याच परिसरात राहणारा आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३) याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पीडितेची वैद्यकिय तपासणी व शवविच्छेदनानंतर खून व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले होते.  फास्ट ट्रॅक चालला खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या न्यायालयात फास्ट टॅक हा खटला चालला. सरकारतर्फे २७ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यात हर्षल प्रकाश केतकर, बालिकेचे शवविच्छेदन करणारे डॉ.निलेश देवराज, पंच मनोज पाटील, भागवत सानप, १५ वर्षाची मुलगी, फिर्यादी मनिषा नरेश करोसिया, रिना राजेंद्र तिवारी, रेखा संजय सोनवणे, रमेश रामदास पाटील, पोलीस कर्मचारी महेश पवार, गणेश देसले, ललित भदाणे, अरुण पाटील, पंच संजय सपकाळे, तहसीलदार अमोल निकम, संतोष कान्हेरे, डीएनए तज्ज्ञ वैशाली महाजन, जन्म मृत्यू निबंधक डॉ.विकास पाटील, डॉ.ऋतुराज चव्हाण, डॉ.अक्षय देशमुख, डॉ.स्वप्नील बढे, तपासाधिकारी बापु रोहोम, उपनिरीक्षक भागवत पाटील, कैलास पाटील, सुरेश गणेशसिंग बयास व प्रवीण मोरे यांच्या साक्षी झाल्या.  या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, आदेशबाबाच्यावतीने अ‍ॅड.गोपाळ जळमकर, अ‍ॅड. विजय दर्जी तर मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.एस.के.कौल यांनी काम पाहिले आहे.अटकेपासून संशयित कारागृहातच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव