शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या मुलीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:15 IST

फुले मार्केटमधील घटना

जळगाव : फुले मार्केटमध्ये खरेदी करत असतांना एका अल्पवयीन मुलीने बीडच्या महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमची सोन्याची मंगलपोत अंत्यत चलाखीने तोडून पळण्याच्या प्रयत्न केला, मात्र महिलेच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला असून संशयित मुलीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर तिच्या सोबतच्या तीन मुली पसार झाल्या आहेत.सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.रामेश्वर कॉलनी येथील प्रमिला गणेश कदम यांच्याकडे त्याच्या बीड येथील नणंद व नातेवाईक आले आहे. हे नातेवाईक मंगळवारी रात्री बीडकडे रवाना होणार आहेत.त्यापूर्वी सोमवारी प्रमिला कदम यांच्यासह त्यांच्या बीड येथील नातेवाईक महिला, मुले खरेदी करण्यासाठी दुपारी३ वाजता फुले मार्केटमध्ये आल्या होत्या. एका हातगाडीवर कदम यांची नणंद पर्स बघत होती, यादरम्यान त्याच्या मागे तीन ते चार अल्वयीन मुली होत्या. यावेळी एका १० वर्षाच्या मुलीने उभ्या महिलेल्या अत्यंत चलीखीने गळ्यातील मंगलपोत तोडली. पोत तुटताच महिलेने पोत ओढणाºया मुलीचा हात पकडला. तिला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.या मुलीसोबत आणखी तीन मुली होत्या. मात्र तिला पकडल्याचे लक्षात येताच, त्या पळून गेल्याचेही कदम यांनी शहर पोलिसांना माहिती देतांना सांगितले.लहान मुलींचा सहभागमहिलेसह तिच्या नातेवाईकांनी मुलीला तिचे आई, वडील व तु कुठली अशी विचारणा केली असता मुलीने आम्ही अकोला येथील असून फुगे विकण्यासाठी सकाळीच शहरात आल्याचे सांगितले. आई, वडील उद्यानात असल्याचे सांगत, महिलांना शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात घेवून गेली. याठिकाणी मात्र कोणीही नव्हते. खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यावर महिलांनी तिला पुन्हा शहर पोलीस ठाण्यात आणले.दरम्यान, चोऱ्यांमध्ये आता अल्पवयीन मुलींचा वापर होऊ लागला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव