शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश तारे यांना व.वा.वाचनालयाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 21:22 IST

जळगाव : वाचनालयाच्या माजी उपाध्यक्षा रोहिणी जोशी यांचे पिताश्री कै. दे.वि. कुळकर्णी व कै.डॉ. उल्हास कडूसकर यांच्या मातोश्री कै. ...

जळगाव : वाचनालयाच्या माजी उपाध्यक्षा रोहिणी जोशी यांचे पिताश्री कै. दे.वि. कुळकर्णी व कै.डॉ. उल्हास कडूसकर यांच्या मातोश्री कै. शैलजा कडूसकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा व.वा. जिल्हा वाचनालयाचा उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार रविवारी वाचनालयाचे सेवक गिरीश तारे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.व.वा. जिल्हा वाचनालयाची १४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी होते़ व्यासपीठावर उपाध्यक्ष अ‍ॅड.सुशील अत्रे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रताप निकम, चिटणीस मिलिंद कुलकर्णी, सहचिटणीस अ‍ॅड. गुरुदत्त व्यवहारे व कोषाध्यक्ष अनिलकुमार शाह आदींची उपस्थिती होती. दीपप्रज्वालनाने सभेची सुरुवात झाली. त्यानंतर वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.प्रभात चौधरी यांनी श्रध्दांजली प्रस्ताव मांडल्यानंतर प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी प्रास्ताविक केले.ग्रंथभेट देऊन सत्कार२००१ रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. चारुदत्त गोखले व प्रा. वसंत सोनवणे यांनीही रोख रक्कम देऊन तारे यांना गौरविले. तसेच नियमित व उत्कृष्ट वाचक म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात कविता जोशी, प्रकाश बाविस्कर, दीपक तांबोळी यांचा अ‍ॅड. गुरुदत्त व्यवहारे, मिलिंद कुलकर्णी, अनिलकुमार शाह यांच्याहस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे चिटणीस मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दलही त्यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार झाला.विविध विषयांवर चर्चासत्कार समारंभानंतर वाचनालयाचे चिटणीस मिलिंद कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. शाह यांनी वार्षिक अहवाल ताळेबंद जमाखर्च व सन २०१९-२०२० चा अर्थसंकल्प, नियमप्रमाणे कार्यकारी मंडळाचे व वर्गणीदारांचे ठराव असल्यास त्याचा विचार करणे आदी विषय मांडण्यात आले. नंतर अभिजित देशपांडे यांनी आयत्या वेळेचे विषय मांडून चर्चा करण्यात आली.वाचनालयास ५१ हजारांची देणगीके़ वाय़.जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व.वा.वाचनालयास डॉ.प्रदीप जोशी यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली. ती वाचनालयाच्यावतीने अ‍ॅड. सुशील अत्रे व अ‍ॅड. प्रताप निकम यांनी स्वीकारली. सभेचे सूत्रसंचालन संगीता अट्रावलकर यांनी केले. तर आभार अभिजित देशपांडे यांनी मानले. सभेला शिल्पा बेंडाळे, विजय पाठक, अ‍ॅड. दत्तात्रय भोकरीकर, शुभदा कुळकर्णी, शांताराम सोनार आदींची उपस्थिती होती.क

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव