शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांनी पाडणाऱ्यांची पुराव्यानिशी नावे सांगावी, गिरीश महाजन यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 04:15 IST

दरवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हेच त्यांना लढत देत आहेत.

जळगाव : विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले आहे.पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. त्यांना अपयश आले, याचे आम्हालाही वाईट वाटते. मुक्ताईनगर मतदार संघातून खडसे हे यापूर्वीही अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात १,२00 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोदी लाट असतानाही केवळ ८,५00 मतांनी निवडून आले आहेत.यावेळी खडसे यांना तिकिट नव्हते. त्यामुळे फरक पडला.दरवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हेच त्यांना लढत देत आहेत. यावेळी तिथे अटीतटीचा सामना होता. त्यातच शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष तिथे एकत्र आले होते. त्यामुळेच १५00-२000 मतांचा फरक पडला.त्यावर भाजपमधीलच काहींनी विरोधकांना मदत केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांची नावेही पक्षश्रेष्ठींकडे दिली असल्याचा आरोप केल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, विरोधकांना कोणी मदत केली? त्याचे नाव व पुरावे थेट जाहीरच करावे.सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. पाडापाडीचे उद्योग आम्ही किंवा पक्षातील कुणीच करत नाही. लढत अटीतटीची होती.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा