शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरांमधून प्लॅस्टिक गोळा करून ग्रामस्थांना दिली कापडी पिशवी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:32 IST

‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ अभियान : एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

जळगाव- एसएसबीटी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी पाळधी गावात ‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ अभियान राबवून घरा-घरातून प्लॅस्टिक गोळा करित ग्रामस्थांना कापडी पिशव्या भेट दिल्या़ या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत असून विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती सुध्दा करण्यात आली.‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ अभियान हा अभियान शनिवारी एसएसबीटी महाविद्यालयाच्या एमबीए विभाग व उन्न भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विशाल एस. राणा यांच्या नेतृत्वखाली राबविण्यात आला़ दरम्यान, एमबीएच्या अभ्यासक्रमातील एक शैक्षणिक भाग म्हणून तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी जोपासली जावी व सामाजिक समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्लॅस्टिक पिशव्यांचे संकलनउपक्रमाअंतर्गत एम.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी पाळधी गावांमध्ये घरोघरी जाऊन प्लॅस्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये शनिवारी सकाळी जनजागृती केली. तसेच नागरिकांच्या घरांमधील प्लॅस्टिक पिशव्यांचे संकलन करून या उपक्रमांतर्गत त्यांना एक कापडी पिशवी भेट दिली. व यापुढे कापडी पिशव्या वापर करावा, असे आवाहन केले़ नागरिकांनी सुद्धा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत यापुढे प्लॅस्टिक पिशव्या वापरणार नसल्याची ग्वाही दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठीउपक्रमाचे समन्वयक डॉ. विशाल राणा, डॉ़ रिचा मोदीयानी, प्रा. मुकेश अहिरराव, डॉ सरोज पाटील व एमबीएच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. संजय शेखावत, डॉ. पी. ए. शिरोळे, डॉ. पी. जी. दामले व प्रा. फरोजा काझी यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव