शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शहरासह ग्रामीणलाही विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:27 IST

विटनेरात दाम्पत्य पॉझिटीव्ह : शहरात बाधितांच्या संपर्कातील १९१ लोक क्वारंटाईन

जळगाव : कोरोनाचा शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने फैलावर होत आहे़ सोमवारी विटनेरच्या डॉक्टर दाम्पत्याचा खासगी लॅबकडून अहवाल पॉझिटीव्ह आला़ दरम्यान, शहरात शनिवारी आढळून आलेल्या बाधितांच्या संपर्कातील चाळीसच्यावर लोकांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे़ शहरातील एकूण १९१ लोक क्वारंटाईन आहेत़ दरम्यान, सोमवारीही जम्बो तपासणी करण्यात आली़ यात १३० जणांचे तपासणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़विटनेर येथील एक डॉक्टर ५८ वर्षीय व त्यांच्या पत्नी ४८ वर्षीय यांनी त्यांची दक्षता म्हणून खासगी लॅबकडून तपासणी करुन घेतली होती़ त्यांचे रविवारी मध्यरात्री अहवाल पॉझिटीव्ह आले़दरम्यान, गावात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ संजय चव्हाण, म्हसावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रशांत गर्ग व डॉ़ नीलेश अग्रवाल यांच्यासह आरोग्य पथकाने गावात उपाययोजना राबविल्या़बाधितांची संख्या १४४ वरदरम्यान, शहरासह तालुक्यात बाधितांची संख्या ११४ च्या जवळ पोहचली असून यात ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे़दरम्यान, शहर व तालुक्यात मृतांचा आकडाही १० वर पोहचला आहे़जम्बो तपासणीजिल्हाभरात सोमवारी तब्बल ४६३ संशयितांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ यामुळे एकत्रित तब्बल ६९१ अहवालांची प्रतीक्षा आहे़ दररोज ही संख्या वाढल्याने प्रलंबित अहवालांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ आजपर्यंत एकत्रित ४८७० लोकांची कोरोना चाचणी झालेली आहे़ त्यापैकी ३६७८ निगेटीव्ह आलेले आहेत़कंटेनमेंट झोनमध्ये मांडे विक्री करणाऱ्याविरुध्द कारवाईजळगाव : मेहरुणमधील अक्सा नगर कंटेनमेंट झोन असतानाही तेथे मांडे विक्री करणाºया खान्देश मांडा सेंटर चालकावर कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. मनपा कंटेनमेंट झोन ७ चे प्रमुख अतुल पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे श्रीकांत बदर, कृष्णा पाटील, होमगार्ड आकाश पाटील,रवींद्र सोनवणेव प्रभाग समिती ३च्या पथकाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली.अशी आहे व्यवस्थाशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या वसतीगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये १४३ जण दाखल असून शाहू महाराज रुग्णालयात ३८ लोकांना दाखल करण्यात आले आहे़ यात रविवारी रात्री भोकर येथील संपर्कातील काही लोकांना दाखल करण्यात आले आहे़लो रिस्कची पण तपासणीशिवाजी नगरात सुरूवातीला बाधित आढळून आलेल्या व्यक्तिच्या शेजारी राहणाºया दोनही घरातील रहिवाशांची खबरदारी म्हणून तपासणी करण्यात आली होती़ आपण थेट संपर्कात नसल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले होते़ मात्र, लो रिस्क कॉन्टॅक्टचीसुद्ध शहरात तपासणी सुरू असल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते़ असे एकत्रित २० जणांची शिवाजीनगरात तपासणी झाल्यानंतर यातील तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते़ त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले़ दरम्यान, शिवाजीनगरातील आधीच्याच संपर्कातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे़ हे प्रौढ व त्यांचे कुटुंबीय कोरोना रुग्णालयात जावून आल्याची माहि ती होती़ त्यामुळे त्यांची तपासणी झाली़ यात अन्य लोक निगेटीव्ह आले आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव