लोकमत ऑनलाइन धरणगाव, जि.जळगाव, दि. 3 : कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंिडत केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी धरणगाव वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. या वेळी आंदोलनाची दखल न घेतल्यास शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिका:यांनी गुरुवारी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता व्ही.व्ही. कुलकर्णी यांना देण्यात आले . या वेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील, जि.प.चे माजी सदस्य रवींद्र पाटील, बाजार समितीचे उपसभापती रंगराव सावंत, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, साळवा येथील किशोर ब:हाटे, रोटवदचे जिजाबराव पाटील, पिंपळयाचे संजय पाटील, गंगापुरीचे सरपंच अनिल पाटील, गारखेडय़ाचे किशोर पाटील, पथराडचे मनोज पाटील, साखरे येथील घनश्याम पाटील, धरणगाव शहराध्यक्ष संभाजी कंखरे, भूषण पाटील, आनंद पाटील, अमोल हरपे, किशोर महाजन, सीताराम मराठे, भगवान शिंदे, वैभव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
कृषिपंपाची वीज मिळण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:35 IST
धरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस विविध मागण्यांसाठी आक्रमक
कृषिपंपाची वीज मिळण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव
ठळक मुद्देधरणगाव तालुक्यात यावर्षी सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे व कार्यकारी अभियंता संभाजी माने यांना राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले. राष्ट्रवादीतर्फे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्ीचे वेतन तत्काळ सुरु करावे या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रथमेश माहोळ यांना देण्यात आले.