शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पैलतीरावर जाण्यासाठी घ्यावा लागतो होडीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 16:59 IST

गिरणा नदीवर पूल म नसल्याने जनतेचे हाल होतात.

 

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल : पाचोरा व एरंडोल तालुक्यातील गावांना येण्या-जाण्यासाठी माहेजी या गावाजवळ गिरण्या नदी पात्रातून पाण्यातून जावे लागते. येथे नदी खोल असल्याने पैलतीरावर जाण्यासाठी होडीच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. अन्यथा पाचोरा अथवा म्हसावद मार्गे जास्तीचे अंतर कापून जावे लागते. ही मोठी अडचण लक्षात घेऊन येथे पूल उभारावा, अशी मागणी या दोन्ही तालुक्यांतील जनतेतून होत आहे.पाचोरा तालुक्यातील माहीजी, वरसाडे,द हिगाव, नांद्रे, लासगाव, सामनेर, बामरुड, मोहाडी, जवखेडा, वडली, दोणगाव, पहाण, पाथरीसह सुमारे ५० गावातील लाखो लोकांना एरंडोल तालुक्यात अथवा पारोळा, धुळे जाण्यासाठी माहिजी नदी ओलांडून अगदी जवळचा हाच मार्ग आहे. परंतु नदीत पाणी असल्याने मोठी वाहने म्हसावद अथवा पाचोराकडून जास्तीचे अंतर कापून जावे लागते. तसेच एरंडोल तालुक्यातील बाम्हणे, हणूमंतखेडे, भातखेडा, उत्राण, ताडे, निपाणे, जवखेडा, गालापूर अंतूर्ली, तळई, कासोदा, नांदखुर्दे, वनकोठा, फरकांडे,उ मरे, पिंपरखेड, आडगाव, मालखेडा, धुळपिंप्री, मंगरुळ यासह शेकडो गावातील जनतेला पाचोरा किंवा म्हसावद मार्गेच जावे लागते. यात इंधन व वेळ वाया जातो. जर का माहिजी गावाजवळ गिरणा नदीवर चांगला पूल बांधला गेला, तर या दोन्ही तालुक्यातील जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. एरंडोल व पाचोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याकामी लक्ष देऊन ही जुनी मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.योगायोगपाचोरा व एरंडोल तालुक्यांतील लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे आहेत. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील व एरंडोल-पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे दोन्ही शिवसेना पक्षाचे असून सत्तेतील प्रतिनिधी आहेत. या दोघांच्या मतदारसंघातील जनतेची ही अनेक दशकांची मागणी या दोघांच्या कालावधीत व्हावी, अशी अपेक्षा या सुमारे शंभरावर गावातील जनतेची आहे. या दोन्ही आमदारांनी समन्वयातून या मागणीसाठी सरकारचे या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष वेधावे, अशी मागणी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल