शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह युवक पोलीसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 20:45 IST

मोटारसायकलवर अमळनेर येथे पिस्तुलासह जाणाऱ्या १९ वर्षीय युवकास शहरालगतच्या बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांनी गुप्त खबरीवरून जाळ्यात घेतला.

ठळक मुद्देरावेर : बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांची कारवाई ; ३५ हजार रू चा मुद्देमाल जप्त

रावेर : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्य़ातील हातोटी गावातून ११ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल मॅगेझीन व जिवंत काडतुसासह मोटारसायकलवर अमळनेर येथे घेवून जाणाऱ्या १९ वर्षीय युवकास शहरालगतच्या बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांनी गुप्त खबरीवरून जाळ्यात घेतला. त्याच्याकडून मोटारसायकल, गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या एका गोपनीय खबरीवरून त्यांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यासाठी सहायक फौजदार इस्माईल शेख, जिल्हा पोलीस शाखेचे पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे, पो. काॅ. सुरेश मेढे, कुणाल पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील यांचे पोलीस पथक नेमले.दरम्यान, आरोपी साईम जानबाझ तडवी (१९, ख्वाॅजानगर, बंगाली फाईल, अमळनेर) याने बऱ्हाणपूर जिल्ह्य़ातील हातोटी गावातून १० हजार रूपये  किमतीचा एक लोखंडी (बीड) धातूची गावठी पिस्तूल त्याचे बटवर प्लास्टिक ग्रीप असलेल्या मॅगझीनसह एक ५०० रू किमतीचे जिवंत काडतूस खरेदी केले. अमळनेर येथे तो मोटारसायकल (क्र एम एच -१९ /ई- ८८१९)ने हे पिस्तुल घेऊन जात होता. त्यास रावेर पोलिसांच्या पथकाने पाताळगंगा परिसरातील बोरखेडा फाट्यावर आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातील १० हजार रूपये किमतीचा गावठी कट्टा, ५०० रूपये किमतीचे जिवंंत काडतूस व २५ हजार रू किमतीचे असे एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार इस्माईल शेख, जिल्हा पोलीस शाखेचे पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे, पो. काॅ. सुरेश मेढे, पो. काॅ. कुणाल पाटील, पो. काॅ. प्रमोद पाटील, पो. कॉ. विशाल पाटील यांनी ही कारवाई केली.विशाल शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रावेर पोलिसात आर्म ऍक्ट. कलम ३ (२५)प्रमाणे आरोपी साईम जानबाझ बेलदार (वय १९) रा अमळनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे रावेर परिसरात एकच खळबळ उडाली असून, सीमेलगतच्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातच गावठी कट्ट्याची अवैध विक्री होत असल्याने गुन्हेगारीला बळ देणाऱ्या अड्डयावर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :RaverरावेरCrime Newsगुन्हेगारी