शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

जळगावात गॅस सिलिंडर ७०० रुपयांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:05 IST

घरगुती सिलिंडर १३ रुपयांनी महागले

जळगाव : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती गेल्या चार महिन्यांपासून सतत वाढत असून आतादेखील घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जळगावकरांना एका घरगुतीसाठी सिलिंडरसाठी ६९५.५० मोजावे लागणार आहे. ७०० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या या सिलिंडरच्या किंमतीत चार महिन्यात तब्बल ११८.५० रुपयांनी वाढ झाली आहे.६८२.५० वरून ६९५.५० वर किंमतदरवाढ होण्यापूर्वी जळगावात घरगुती सिलिंडरची (१४ किलो) किंमत ६८२.५० रुपये होती. त्यात डिसेंबर महिन्यात १३ रुपयांची वाढ होऊन सिलिंडरची किंमत आता ६९५.५० रुपयांवर पोहचली आहे.सलग भाववाढीने गणित कोलमडतेयसप्टेंबर महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. यामध्ये आॅगस्ट महिन्यात ५७७ रुपयांवर असलेल्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत सप्टेंबर महिन्यात १५.५० रुपयांनी वाढ होऊन ते ५९२.५० रुपयांवर पोहचले. त्यानंतर पुन्हा आॅक्टोबर महिन्यात १२.५० रुपयांनी वाढ होऊन सिलिंडरच्या किंमतीने ६०० रुपयांचा पल्ला ओलांडून ते ६०५ रुपयांवर पोहचले. ही वाढ अशीच सुरू राहून नोव्हेंबर महिन्यात तर थेट ७७.५० रुपयांची वाढ होऊन सिलिंडर ६८२.५० रुपयांवर पोहचले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा वाढ होऊन सिलिंडरच्या किंमती १३ रुपयांनी वधारल्या व सिलिंडर ६९५.५० रुपयांवर पोहतच ते ७०० रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सिलिंडरच्या या वाढत्या किंमतीने गृहिनींचे ‘बजेट’ कोलमडत आहे.व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत २९७ रुपयांनी वाढघरगुती सिलिंडर सोबतच व्यावसायिक सिलिंडच्या किंमतीतही वाढ होत असून चार महिन्यात हे सिलिंडर २९७ रुपयांनी महाग झाले आहे. आॅगस्ट महिन्यात ९३०.५० रुपयांवर असलेल्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत सप्टेंबर महिन्यात १४५.५० रुपयांनी वाढ होऊन ते १०७६ रुपयांवर पोहचले. त्यानंतर मात्र आॅक्टोबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांना दिलासा मिळाला. कारण या महिन्यात या सिलिंडरच्या किंमती ७१.५० रुपयांनी कमी होऊन सिलिंडर १००५ रुपयांवर आले. त्यानंतर मात्र नोव्हेंबर महिन्यात थेट २१४.५० रुपये अशी प्रती सिलिंडर भरमसाठ वाढ होऊन हे सिलिंडर १२१९.५० रुपयांवर पोहचले. डिसेंबर महिन्यातही दरवाढ कायम राहून आठ रुपयांची वाढ होऊन व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १२२७.५० रुपयांवर पोहचल्या.नोव्हेंबर महिन्यात ६८२.५० रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत होते, आता त्याची किंमत ६९५.५० रुपये झाली आहे.- अजय ठोंबरे, व्यवस्थापक गॅस एजन्सी.

टॅग्स :Jalgaonजळगाव