भुसावळ, जि.जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये सातत्याने साफसफाई होत नसल्याचा नसल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकून रोष व्यक्त केला व सातत्याने प्रभागात साफसफाई व्हावी, यासाठी पालिकेत निवेदन दिले.खडका रोड, गौसिया नगर, पंचशील नगर, काझी प्लॉट या परिसरात साफसफाई सातत्याने होत नाही. यामुळे परिसरात कचºयाचे ढिग साचलेले आहे. गटारी महिनोगनती साफ होत नाही. गटार तुडूंब भरलेली असते. यामुळे संतप्त झालेल्या काझी प्लॉट भागातील नागरिकांनी पालिकेच्या प्रवेश द्वारासमोर लोटगाडीवर कचरा आणून टाकला. आम्ही फक्त करच भरायचा का, आम्ही नागरिक नाहीत का, प्रभागात एकही लोकप्रतिनिधी येऊन ढुंकूनही पाहत नाही. फक्त आश्वासने दिली जातात. समस्याचे निराकरण करण्यात येत नाही. ठरावीक प्रभागातच स्वच्छता केली जाते, असे अनेक संतप्त प्रश्न यावेळी करण्यात आले. आमच्या प्रभागात नियमित साफसफाई करावी व लक्ष द्यावे. लक्ष न दिल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला. पालिका प्रशासनातर्फे कार्यालय अधीक्षक अख्तर खान यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनावर शेक आसिफ शेख उस्मान, धर्मेंद्र चौधरी, धनसिंग पारधी, शकील शहा गुलाब शहा, चमेलाबाई चौधरी, शोभाबाई पारधी, शेख जाकीर, परवीन विश्वकर्मा, शेख सलमाबी, शेख सलमान शेख मुश्ताक, शेख रोशन, वसीम शहा फिरोज शहा, सलीम बागवान यांच्या सह्या आहेत.
भुसावळ पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर संतप्त नागरिकांनी टाकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:11 IST
भुसावळ , जि.जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये सातत्याने साफसफाई होत नसल्याचा नसल्याचा आरोप करीत संतप्त ...
भुसावळ पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर संतप्त नागरिकांनी टाकला कचरा
ठळक मुद्देसाफसफाई करताना भेदभाव होत असल्याचा आरोपपरिसरात पडलेले असतात कचऱ्याचे ढिगआम्ही फक्त करच भरायचा का?