शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 21:17 IST

तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे...

विजयकुमार सैतवाल -जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेला गणेश गंगाधर कोळी (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा तरुण गिरणा नदीपात्रामध्ये वाहून गेला. या तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. ही घटना शनिवारी (६ सप्टेंबर) संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात नवीन बायपास लगत घडली.अनंत चतुर्दशीला, ६ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप दिला जात असताना ममुराबाद येथील कोळी कुटुंबदेखील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारात गिरणा नदी पात्रामध्ये गेले होते. या ठिकाणी गणेश कोळी हा तरुण गणपती मूर्ती घेऊन नदीपात्रात गेला. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह वेगात आहे. त्यामुळे गणेश कोळी हा तरुण पाण्यात बुडाला व बेपत्ता झाला. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, पोलिस नाईक प्रकाश चिंचोरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अन्य विभागांना माहिती देऊन दिली. तरुणाचा नदीपात्रामध्ये शोध घेतला जात आहे.आई, वडील व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या डोळ्या समोर गणेश हा नदीपात्रात बुडाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेGanesh Visarjanगणेश विसर्जन