शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकी जोपासत गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर निर्माण केला आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 16:22 IST

बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी गणेश मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काढले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे गौरवोद्गारडी.जे., डॉल्बीमुक्त गणेशोत्सवजळगाव उपविभागातील २८ उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीसाचे वितरण

आॅनलाईन लोकमत जळगाव दि,१५: बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी गणेश मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काढले.

 पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात रविवारी पोलीस दलाच्यावतीने उपविभागातील २८ उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी, उपमहापौर,गणेश सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, मुकुंद मेटकर आदी उपस्थित होते. मिलिंद केदार यांनी शेरोशायरी करत सूत्रसंचालन केले. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आभार मानले.

डी.जे., डॉल्बीमुक्त गणेशोत्सवजिल्ह्यात यंदा प्रथमच डी.जे. व डॉल्बी मुक्त असा गणेशोत्सव जिल्ह्यात साजरा झाला, त्याचे श्रेय हे गणेश मंडळांचेच असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. जळगाव उपविभागात २७५ मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला, त्यापैकी २८ मंडळांनी उत्कृष्ट काम करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. वाहतूक व गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी व निर्भया पथकाच्या तरुणींनी मोलाचे काम केल्याचे कराळे म्हणाले. यावेळी सचिन सांगळे, करीम सालार, मुकुंद मेटकर, सचिन नारळे, दीपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.