भडगाव येथील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत हाते. आमदार नीलेश लंके यांचे भडगाव शहरात आगमन झाले. या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीसह सत्कार सोहळ्यांनी आमदार नीलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रहार संघटना, युवा सेना, स्व. बापुजी युवा फाउंडेशनमार्फत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. या वेळी माजी आमदार दिलीप वाघ, बापूजी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष लखीचंद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत भोसले, युवक अध्यक्ष स्वप्निल पाटील, उपाध्यक्ष विकी पाटील, माजी तालुकाध्यक्ष व्ही.एस. पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष निमन शेख, संदीप चव्हाण, भूषण पाटील, भाऊसाहेब परदेशी, विवेक पवार, स्वदेश पाटील, कुणाल पाटील, गोपी पाटील, शेरू पठाण हजर होते.
सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी फाउंडेशनचे सदस्य हर्षल पाटील, विनोद पाटील, मधुकर वाडेकर, रवींद्र पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राजपूत, नीलेश पाटील, प्रथमेश पाटील, भोला पाटील, चेतन पाटील, प्रशांत सोनवणे, भय्या पाटील, अमोल पाटील, प्रशांत गालफाडे यांनी परिश्रम घेतले.