यावल : तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी झन्नामन्ना हा पत्त्याचा जुगार खेळताना पोलिसांनी धाड टाकून ११ जणांना पकडले. याचबरोबर ३ मोटारसायकलींसह ५० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३ हजाराहून रुपयांचा ऐवज जप्त केला. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३० जून रोजी १७ वाजताच्या सुमारास डोंगरकठोरा गावातील डोंगरकठोरा ते यावल रस्त्यावरील खंडेराव मंदिराजवळील खुल्या पटांगणावर सार्वजनिक ठिकाणी जगदीश रतन धनगर (सांगवी बु.) , मिलिंद संतोष कोळी (डोंगर कठोरा), तुषार वसंत फेगडे (अट्रावल) , प्रदीप रवींद्र भालेराव (कोळवद), गोविंदा सुरेश कोळी (अट्रावल). नितीन पंढरीनाथ चौधरी (अट्रावल), अन्वर फकिरा तडवी (डोंगर कठोरा), सुशील अशोक कोळी (डोंगर कठोरा), दिलीप कृष्णा तेली (सांगवी बु.), चंदन भीमराव अढाईगे (कोळवद) अशा दहा जणांना पकडले. यासंदर्भात पोलीस अंमलदार सुशील रामदास घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार ॲक्ट १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक फौजदार मुजफ्फर खान करीत आहे.
डोंगर कठोरा येथे जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST