शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर रुग्णांचे होतेय पूर्ण वेळ निरीक्षण - डॉ़ मधुकर गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:55 IST

व्याधी असताना अंगावर काढणे धोकादायक

जळगाव : गंभीर रुग्णांवर पूर्णवेळ निरीक्षण, लवकर निदान अशा उपाययोजनांनी जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर घटत आहे, असा विश्वास सल्लागार, समन्वयक डॉ़ मधुकर गायकवाड (मुंबई) यांनी व्यक्त केला आहे़ आपल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात अन्य व्याधी असलेल्या रुग्णांनी कोरोना अंगावर काढल्याने धोका अधिक वाढला, असेही ते म्हणाले़ ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आगामी नियोजन मांडले़ जिल्ह्याच्या सध्याच्या परिस्थितीबाबात माहिती दिली.प्रश्न : जळगावच्या परिस्थिीबाबत काय वाटते?डॉ़ गायकवाड : रुग्ण संख्या वाढली आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सुचनांनुसार सर्व नियोजन व औषधोपचार सुरळीत पद्धतीने सुरू आहेत़ आपण आल्यानंतर पीपीई किटबाबत तसेच रुग्णांबाबत प्रशिक्षण दिले़ अनेक बाबी ज्या नव्हत्या त्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या़ आता बऱ्याच बाबी जसे डिजिटल एक्से, मॉनिटर्स, व्हँटीलेटर याबाबी रुग्णालयाला उपलब्ध झालेल्या आहेत़प्रश्न : मृत्यूदर घटत नसल्याचे चित्र आहे का?डॉ़ गायकवाड : असे नाही, आधी पाच ते सहा मृत्यू दिवसाला होत होते, ते दोन किंवा तीनवर आले आहेत़ ७ टक्यांवर मृत्यूदर आलेला आहे़मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा आजही कायम आहे काय सांगाल?याबाबत अधिष्ठाता व जिल्हाधिकारी सांगू शकतील़ मात्र, गंभीर रुग्णांना ज्या सुविधा जागेवरच देणे गरजेचे आहे, त्या सुविधा आम्ही जागेवरच उपलब्ध करून देत आहोत, सर्वांना तशा सूचना आहेत़ आॅक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला आॅक्सिजन काढून स्वच्छतागृहात जावे लागले तर पुढे अडचणी वाढतात, त्यामुळे बेडपॅन आम्ही उपलब्ध करून देतो़डॉक्टर्स पूर्णवेळ, पूर्ण मेहनतीने, पूर्ण शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना बरे करण्यासाठी लढत आहेत़ लोकांनी सहकार्य करावे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक चांगले आहे़- डॉ़ मधुकर गायकवाड, तज्ञ सल्लागार, समन्वयक, कोविड रुग्णालय

टॅग्स :Jalgaonजळगाव