शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक गरजांची पूर्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 11:35 IST

विजयकुमार सैतवालवैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा गाजावाज करीत जळगावात वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारण्याचा तयारी सुरू आहे. मात्र रुग्णांना आवश्यक बाब असलेले औषधीच उपलब्ध करून दिली जात नसल्याने तसेच पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने हैराण झालेल्या रुग्णांकडून आता किमान प्राथमिक गरजा तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली ...

विजयकुमार सैतवालवैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा गाजावाज करीत जळगावात वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारण्याचा तयारी सुरू आहे. मात्र रुग्णांना आवश्यक बाब असलेले औषधीच उपलब्ध करून दिली जात नसल्याने तसेच पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने हैराण झालेल्या रुग्णांकडून आता किमान प्राथमिक गरजा तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली जात आहे.जळगाव जिल्ह्यातील मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना वैद्यकीय खाते मिळाल्यानंतर जळगावात वैद्यकीय संकूल उभारण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या व येथे हे संकूल मंजूर झाले. यासाठी चिंचोली शिवारात जागा निश्चित होऊन ती वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीतही झाली. मात्र येथे बांधकाम होईपर्यंत जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात आवश्यक बदल केले जात आहे. इतकेच नव्हे या वर्षापासूनच वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र येथे प्राथमिक गरजांचे चित्र पाहता रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता आरोग्य विभागाकडून येणारा निधी यासाठी खर्च करता येत नाही. त्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची पूर्तताच सुरू असल्याने वैद्यकीय विभागाकडूनही सहजासहजी निधी मिळत नाही. तसे पाहता आॅक्टोबर २०१७मध्ये जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्यानंतर जवळपास पाच महिने आरोग्य विभागाकडून औषधी, आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र आता जिल्हाभरातील रुग्णालयांमध्येच सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याने आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रुग्णालयांमध्ये औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यात आता निधीदेखील संपल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असलेल्या जिल्हा रुग्णालयाने त्यांनाच व्यवस्था करण्याचे कळविले. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून मनोविकारावरील औषधी संपल्याचे रुग्णांना सांगितले जात आहे. जिल्हा भरातील मनोरुग्ण येथे औषधी घेण्यासाठी येत असतात. मात्र औषधीच नसल्याने त्यांना माघारी परतावे लागते. तसेच ही औषधी बाहेरून खरेदी करा, असे सांगून ती लिहून दिली जाते, मात्र अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांचे हाल होतात. औषधीसाठी वारंवार चकरा मारल्या तरी औषधी मिळत नाही. या बाबत विचारले असता उद्धटपणे उत्तर दिले जाते, असे रुग्णांचे म्हणणे आहे. खोकल्याचेही औषधी येथे उपलब्ध नाही. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय संकुलाचे स्वप्न पूर्ण होत असताना प्राथमिक गरजांचीही पूर्तता करा, असाच सूर उमटत आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव