आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.२५- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतमजूरांची परवड होत आहे. शेतकºयांसारखी त्यांची हेळसांड होत असून शेतमजुरांना कामे देखील मिळत नाहीत. त्यामुळे शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनकडून १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ रोजी शहरातील बळीराम पेठेतील लाल बावटा कार्यालयात पार पडलेल्या राज्य कौन्सीलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड.मनोहर टाकसाळ हे होते. तर कॉ.नामदेव चव्हाण, अमृत महाजन, शिवकुमार गणवीर, जिल्हाध्यक्ष शांताराम पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मण श्ािंदे, शारदा बनसोड, गणेश शेंडगे, संतोष पाटील, प्रकाश भावसार, कालू कोळी, गणपत राठोड, देवानंद कोळी आदी उपस्थित होते. बैठकीत शेतमजुरांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धारही करण्यात आला. या आहेत विविध मागण्या शेतमजुरांसाठी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यात यावी, ६० वर्षावरील मजूरांना पेन्शन देण्यात यावी, रोजगार हमी योजनेत ५०० रुपये वेतन देण्यात यावे, शेतमजूरांना मागणीनुसार मनरेगाची कामे देण्यात यावीत व केरळ, तामीळनाडू या राज्यांच्या धरतीवर भविष्य निर्वाह निधीची तरतूद करण्यात यावी या मागण्यांसाठी हा १८ डिसेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसेच ६ डिसेंबर हा दिवस दलीत अत्याचार विरोधी व २६ जानेवारी हा दिवस संविधान बचाव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
शेतमजुरांच्या प्रश्नी विधानसभेवर मोर्चा; शेतमजूर युनियनच्या बैठकीत जळगावात निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:27 IST
शेतकºयांसारखीच शेतमजुरांची स्थिती
शेतमजुरांच्या प्रश्नी विधानसभेवर मोर्चा; शेतमजूर युनियनच्या बैठकीत जळगावात निर्णय
ठळक मुद्दे हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेवर मोर्चा ६ डिसेंबर हा दिवस दलीत अत्याचार विरोधी व २६ जानेवारी हा दिवस संविधान बचाव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय