शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर ओव्हरटेक करताना दोन ट्रक धडकले समोरासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:14 IST

जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजता पाळधी बायपास महामार्गावर झाला.

ठळक मुद्दे पाळधी जवळ पहाटे पाच वाजता अपघात एका ट्रकचा चालक ठार   दोन्ही ट्रकमधील तीन जखमी

जळगाव : जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजता पाळधी बायपास महामार्गावर झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलीम हा व त्यांचा मुलगा क्लिनर मो. नासीर हे दोघं शनिवारी रात्री १० वाजता अकोला येथून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.४९ टी.८७८४) तूर डाळ घेऊन मुंबई जात होते तर अरविंदकुमार राय (रा.भिलाई, छत्तीसगड) हा मुलगा क्लिनर धनंजयसह मालेगाव येथून ट्रकमध्ये (क्र.सी.जी.ए.डब्यु.८७३९) कांदा घेऊन छत्तीससगड येथे जात असताना राष्टÑीय महामार्गावर पाळधी बायपासजवळ मो.इस्लाम खान याचा ट्रक ओव्हरटेक करीत असताना कांद्याच्या ट्रकवर धडकला.त्यात ट्रकचा चक्काचूर होऊन मो.इस्लाम खान जागीच ठार झाला. तर मुलगा नासीर जखमी झाला. कांद्याच्या ट्रकमधील चालक अरविंदकुमार रॉय व मुलगा धनंजय हे दोन्ही जखमी झाले.

क्रेन मागवून काढला मृतदेह बाहेरया अपघातात डाळीच्या ट्रकचा चुराडा झाला असून मो.इस्लाम खान हा कॅबीनमध्ये दाबला गेला होता. मृतदेह बाहेर काढणे शक्यच नव्हते. त्यामुळे पाळधी महामार्गाचे उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी क्रेन मागवून दोन्ही ट्रक बाजुला केला व पत्रा कापून अडकलेला मृतदेह बाहेर काढला.मृतदेहासह जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. यावेळी रस्त्यावर कांदेच कांदे झाले होते. दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. दिलीप पाटील व त्यांच्या सहकाºयांनी वाहने हटवून वाहतुक सुरळीत केली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेंद्र बिष्णोई यांच्या खबरीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कॉन्स्टेबल प्रकाश पाटील व अभिजीत सैंदाणे यांनी पंचनामा केला. शून्य क्रमांकाने हा गुन्हा धरणगाव पोलीस स्टेशनला वर्ग होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव