शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 14:56 IST

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून संघर्ष सुरूचकार्यकर्ते कमी अन् नेतेच जास्तगट-तटाच्या राजकारणाचा फटका

जळगाव : कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत.जिल्ह्यात काँग्रेसला मोठा इतिहास आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशनदेखील फैजपूर येथे झाले आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची मात्र जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे.जळगाव महानगरपालिकेत गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून येत नाही. काँग्रेसने सन २००३ मध्ये २४ उमेदवार दिले होते. त्यानंतर झालेल्या २००८ च्या निवडणुकीत २६ तर सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिले होते. तिन्ही निवडणुकीत मात्र काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. या वेळी निवडणुकीत काँग्रेसकडून पदाधिकाºयांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत निर्णय झाला. मात्र एकाही पदाधिकाºयाने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐनवेळी केवळ १७ जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आले.जिल्हा काँग्रेसला जळगावात गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे पक्षाचा मेळावा घेण्यापासून ते पदाधिकारी नियुक्ती या सर्व प्रक्रिया पक्षश्रेष्ठींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.एका गटाला सांभाळत असताना दुसरा गट नाराज होत असल्याने त्याचा फटका पक्षाच्या स्थितीवर होत आहे. एकसंधपणे सर्व नाते कामे करताना दिसत नाही. फक्त बाहेरील कुणी मोठा नेता काँग्रेस भवनात आल्यावर जिल्ह्याच्या कानाकोपºयातील नेते व्यासपीठावर बसण्यासाठी फक्त एकत्र येतात, त्यानंतर फिरकतही नाही.पदाधिकाºयांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेकाँग्रेसचे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी प्रदेशाध्यक्षांनी जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही गटांना प्रदेश कार्यकारिणीवर स्थान दिले. त्यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डी.जी. पाटील, अ‍ॅड. ललिता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश आहे. यासह इतर पदाधिकाºयांनी एकत्र येत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.पक्ष निरीक्षकांनी टेकले हातजळगाव जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी प्रदेशस्तरावरून जिल्हा प्रभारी पाठविण्यात आले. माजी उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार भाई जगताप, आमदार विनायक देशमुख यांनी जिल्हा प्रभारी म्हणून काम पाहिले. काही प्रमाणात या नेत्यांनी शिस्त लावण्याचे कामदेखील केले. मात्र गटबाजीच्या राजकारणाने पोखरलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती सुधारण्यात जिल्हा निरीक्षकांनादेखील यश आले नाही. काँग्रेसच्या मेळाव्यात किंवा कार्यक्रमात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची व्यासपीठावर सर्वाधिक गर्दी असते.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव