शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी राहणार महिन्यातील जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:12 IST

थंडी ओसरली, उष्णता वाढली : थंडी कमी तरीही तापमान जास्त

जळगाव : थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने जळगावचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून वाढले आहे. तापमानाची ही झळ पुढील चार दिवस राहणार आहे. शुक्रवारी दि. २८ रोजी या मोसमातील सर्वाधिक तापमान असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रविवारी जळगावचे कमाल तापमान हे ३६ तर किमान तापमान हे १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.गेल्या आठवड्यात असलेली गारव्याची झुळूक आता कमीकमी होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावचे तापमान वाढले असून तापमानाचा पारा आता ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या तुलनेत संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट असून पुढील दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हा अंदाज राज्यभरासाठी असला तरी जळगाव जिल्ह्याचे तापमान पुढील दोन दिवसात रविवार इतकेच राहणार आहे.दरम्यान, एप्रिल, मेमध्ये सर्वाधिक उष्णतेचे चटके बसणाºया जळगावात तापमान अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत २३ फेब्रुवारीला कमी होते. जळगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी तरी पुढील महिन्यापासून मात्र हळूहळू े तापमान वाढणार आहे.दि. २३ रोजी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही अहमदनगर जिल्ह्यात झाली असून या जिल्ह्याचे कमाल तापमान हे ३८ तर किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.त्याखालोखाल सिंधुदूर्ग ३७ अंश, १९ अंश तर रत्नागिरीचे तापमान हे ३६ अंश व किमान तापमान २० अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले आहे. किमान तापमान सर्वात कमी गोंदीया जिल्ह्यात (२० अंश सेल्सिअस) तर सर्वात जास्त डहाणू येथे (२३ अंश सेल्सिअस) येथे नोंदवण्यात आले आहे.जळगाव शहर हे महाराष्टÑातील सर्वाधिक तापमान नोंदविले जाणारे शहर आहे. मार्च महिन्याला सुरुवातही झाली नाही, तितक्यात आतापासून मे हिटची चाहूल जाणवू लागली आहे.गेल्यावर्षीपेक्षा यंदा तापमान कमीयंदा सर्वच ऋतु उशिराने सुरु झाले. त्याप्रमाणे उन्हाळाही उशिराने सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे या दरम्यानचे तापमान कमीच आहे. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी जळगावचे कमाल तापमान ३७ तर किमान तापमान हे १७ अंश सेल्सिअस एवढे होते. यावर्षी मात्र तापमानात थोडी घट आहे.शुक्रवार ठरणार ‘हॉट’हवामानाशी संबंधित ‘टाईम अ‍ॅण्ड डेट’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमधील २८ तारखेचा दिवस हा सर्वाधिक ‘हॉट’ असणार आहे. कारण त्यादिवशी कमाल तापमान हे ३७ अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. त्यानंतर पुढील ७ व ८ मार्च हे दोन दिवस उष्णतेचे राहणार आहेत.यंदा उन्हाळ्याचे चटके उशिराने बसणार?हवामानावर अभ्यास करणाºया ‘अ‍ॅक्युवेदर’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार जळगाव जिल्ह्याला यंदा उन्हाळ्याचे चटके उशिराने बसणार आहेत. गेल्या वर्षी २८ मार्चला तापमानाची चाळीशी पार केली होती, मात्र यंदा चाळीशी पार करायला ६ ते ९ एप्रिल उजाडणार असल्याचे वृत्त या वेबसाईटने दिले आहे. २८ एप्रिलला यंदा सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे.गेल्या दोन वर्षातील तापमान२३ फेब्रुवारी २०१८३७ अंश सेल्सिअस, १७ अंश सेल्सिअस२३ फेब्रुवारी २०१९३३ अंश सेल्सिअस, १७ अंश सेल्सिअस२३ फेब्रुवारी २०२०३६ अंश सेल्सिअस, १९ अंश सेल्सिअस 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव