शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ; ११ जूनला मोफत जयपूर फूट शिबिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 07:56 IST

लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : स्वातंत्र्यसेनानी आणि  ‘लोकमत’ चे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ११ जून रविवार रोजी साधू वासवानी  मिशन (पुणे) यांच्या वतीने  मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे

सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन, बीएसएनएल कार्यालयामागे जळगाव येथे सकाळी ९ ते २ या वेळेत हे शिबिर होईल. वेगवेगळ्या  कारणांनी  हात किंवा पाय  गमावलेल्यांना  कृत्रिम  अवयवांचे  बळ मिळून आयुष्यात  नवी उमेद  जागविण्याचे  काम यानिमित्ताने  होणार आहे. शिबिरात  तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक कृत्रिम अवयवांचे  माप घेतले जाईल. त्यानंतर  काही  दिवसांनंतर कृत्रिम अवयवांचे वितरण केले जाईल. लोकमत  समूहातर्फे हे शिबिर  आयोजित  करण्यात  आले आहे. शिबिरात  पोलिओग्रस्त रूग्णांना  कृत्रिम  अवयव  मिळणार  नाहीत.

मधुमेह  रक्तवाहिन्यांचे  आजार,  गँगरीन, अपघात  आणि इतर  कारणांमुळे  हात-पाय  गमविण्याची  वेळ  काहींवर येते. अशा व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना दुसऱ्यावर अवलंबून राहावे  लागते. मात्र कृत्रिम  हात-पाय  बसवल्याने संबंधित  व्यक्ती  व्यवस्थित कामे करू शकते. हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे  असतात. या कृत्रिम अवयवांमुळे अगदी  पूर्वीप्रमाणे  व्यक्ती चालू  शकतो, सर्व कामे  करू शकतो. या अवयवांच्या  मदतीने  अगदी  सायकल, रिक्षा चालविण्यासह  ॲथलेटिक्स, खेळ आणि नृत्यातही  सहभागी होता येते.

नोंदणी करण्यासाठी संपर्क

- कृत्रिम  अवयव  घेणे आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना शक्य होत नाही. मात्र या  शिबिराच्या माध्यमातून  हे कृत्रिम  अवयव मिळणे  शक्य होणार आहे.

- शिबिरात  सहभागी  होण्यासाठी ९४०३५१५६४८ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन  आयोजकांनी केले आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावLokmatलोकमत