शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून ९४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:48 IST

ठगाला अटक; तब्बल १८० केंद्र चालकांना घातला गंडा

ठळक मुद्देसाखळीतील मुख्य सूत्रधार अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाने पिंप्राळा येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या १८० केंद्र चालकांना ९४ लाख १४ हजार ८५३ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

साखळीतील मुख्य सूत्रधार अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले. कळमकर याच्यावर राज्यभर अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पिंप्राळा येथील योगिता उमेश मालवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मायभूमी ग्रामविकास संस्थेचा सचिव अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर, अध्यक्षा प्रीती विनायक खवले, उपाध्यक्षा प्रमिला अर्जुन कळमकर, खजिनदार कांचन दादाभाऊ ढगे, सदस्य शिवराम अप्पाजी जासूद, संगीता शिवराम जासूद व अर्जुन माधव कळमकर यांच्यासह इतर तीन अशा दहा जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत कळमकर याने १८० केंद्र चालकांकडून ९४ लाख रुपये उकळले. 

बीएचआरसारखीच पोलिसांची कारवाईnया प्रकरणात बीएचआरसारखीच कारवाई झाली आहे. गुन्हा दाखल होण्याआधी कळमकर याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. त्याच्या मागावर काही जण लावण्यात आले. nपोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी लगेच आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक भास्कर डेरे यांना पथक रवाना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच कळमकर याला अटक करण्यात आली.

 

टॅग्स :ArrestअटकNIti Ayogनिती आयोग