शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोवीड किटच्या एजन्सीसाठी व्यापार्‍याची ५५ हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 20:21 IST

जळगाव : मास्क आणि कोवीड कीटची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून चेतन डिगंबर वाणी ( वय ४३, रा.गणेश कॉलनी) या ...

जळगाव : मास्क आणि कोवीड कीटची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून चेतन डिगंबर वाणी ( वय ४३, रा.गणेश कॉलनी) या कापड व्यापार्याची ५५ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झालाआह.चेतन डिगंबर वाणी यांना २४ जुलै रोजी दुपारी वाणी हर्षील पटेल या नावाने प्रितमपूर येथून बोलत असून आमची ए यू २४ एच ७ नावाची मास्क व सॅनिटायझर, कोवीड कीट तयार करण्याची कंपनी आहे. ऑनलाईन ऑर्डर घेवून साहित्य घरपोच पोहचवित असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर संबंधिताने वाणी यांना जळगावची एजन्सी घ्या, असे सांगून आम्ही सर्व मटेरीयल घरपोच पाठवू असे सांगितले. एजन्सी घेण्याचा फॉर्म सुध्दा संबंधिताने पाठवला. यानंतर वाणी यांनी दिलेल्या मेल आयडीवर सर्व डिटेल्सही संबधिताने पाठविले.२५ जुलै रोजी रोजी वाणी यांनी संबंधितांना फोनवरुन एजन्सी घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यानंतर दुसर्‍या दिवशीच फोन आला. फोनवरुन खुशबू मॅडम बोलत असल्याचे सांगण्यात आले. तसेच एजन्सी घ्यावयाची असेल तर रजिस्ट्रेशन व ५५ हजार ५० रुपये डिपॉझिट करावे लागलीत, असे सांगण्यात आले. त्यानुसार २७ जुलै रोजी वाणी यांनी मध्यप्रदेश येथील बॅक ऑफ बडोदाच्या निपानीया शाखेत ए.यू.निखिल कुमावत नावानेअसलेल्या खात्यावर ५५ हजार ५०० रुपये जमा केले. पेैसे जमा केल्यावरही माल न आल्याने वाणी यांनी संबधितांना संपर्क साधला असता ४ ऑगस्ट पर्यंत मिळेल असे सांगून उडवाउडवीचे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर वाणी यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव