शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:03 IST

जवखेडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर मंगळवारी कारवाई केली.

एरंडोल, जि.जळगाव : तालुक्याील जवखेडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर मंगळवारी कारवाई केली.१७ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जवखेडे गावातील अंजनी नदी पात्रात समाधान पाटील, गोपाल पाटील, सुधाकर पाटील, बबलू पाटील ह्या ग्रामस्थांनी चार ट्रॅक्टर अंजनी नदी पात्रात थांबवून ठेवले होते. यापैकी दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली होती तर दोन ट्रॅक्टर हे वाळू भरण्यासाठी आले होते. या घटनेबाबत ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांना कळविले. पोलीस पाटील यांनी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन शी संपर्क साधून माहिती दिली. यावरून एरंडोल पोलीस स्टेशनचे एपीआय तुषार देवरे, हेडकॉन्स्टेबल विकास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राजू पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टरचालकांना विचारपूस केली. त्यांच्याजवळ वाळू वाहतुकीचे परवाने नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक एमएच-१९-पीयू-३५४४, एमएच-१९-८६९४, एम एच-१९-डीजे-९९३३ व एमएच-१९-सीव्ही-९३८१ असे चार ट्रॅक्टर जप्त केले. या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५ हजार रुपयांची वाळू आहे.दरम्यान, घटनेबाबत जवखेडे येथील पोलीस पाटील महेश वसंत पाटील यांनी स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून संशयित संजय विठ्ठल महाजन रा.एरंडोल, अमोल बाळू पाटील रा.धारागीर, किरण विलास चौधरी रा.एरंडोल, प्रवीण महादू पाटील रा.धारागीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :sandवाळूErandolएरंडोल