भुसावळ, जि.जळगाव : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारी शहरातील १८ शाळांमधील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार केले. यावेळी पॅरामेडिकल आर्मीमध्ये सेवेत असलेल्या उज्वला साळुंके-मांडवकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभाग, क्रीडा भारती, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघ, जिल्हा जळगाव यांच्यातर्फे सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर भुसावळ रोटरी क्लब आॅफ रेल सिटी व हिंदू सभा न्यास प्रायोजक होते. याप्रसंगी क्रीडा भारतीचे अध्यक्ष ब्रिजेश लाहोटी, हिंदू सभा न्यासचे अध्यक्ष सोनू मांडे, दत्तात्रय मांडवकर, रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान आदी व्यासपीठावर उपस्थित होते.स्वत:ला कमी न समजता परिस्थितीवर मात करत आपण आपली प्रगती साधली पाहिजे. अनेक महिला विपरीत परिस्थिती असतानाच पुढे गेल्या आहेत, असे मत उज्वला मांडवकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील किन्हीसारख्या गावात राहूनही तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत शिकणाऱ्या व लग्नानंतरही पतीच्या प्रोत्साहनाने शिकतच आर्मीत दाखल झालेल्या मांडवकर यांचा तसेच क्रीडाशिक्षक प्रदीप साखरे यांना चैनई येथे डॉक्टर आॅफ स्पोर्ट्स पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजू कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक बी. एम. पाटील, मधुकर वाणी, संजू पाटील, स्वप्नील गुरव, दीपेश सोनार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील, रेल सिटीचे सचिव मनोज सोनार, दीपक धांडे, पुरुषोत्तम पटेल, सागर वाघोदे, जीवनज्योती फाउंडेशनचे संस्थापक गोपाळ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
भुसावळला चार हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:41 IST
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारी शहरातील १८ शाळांमधील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार केले.
भुसावळला चार हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार
ठळक मुद्देभुसावळला शहरातील १८ शाळांचा सहभागमान्यवरांनी केले मार्गदर्शन