शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे शिवारात बिबट्याने पाडला चार शेळींचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:26 IST

पावलांचे आढळले ठसे

चाळीसगाव, जि. जळगाव : वडगाव लांबे शिवारातील बबनराव राखुंडे यांच्या शेतात बांधलेल्या बक-यांवर रविवारी पहाटे बिबट्याने हल्ला चढवत चार शेळींचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने केलेल्या शोधमोहिमेत बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले आहे.महादेव मंदिरालगत राखुंडे यांचे शेत असून शेतातील सालदार महादू कोळी हे शेतातच राहतात. त्यांच्याकडे आठ ते दहा बक-या आहेत. गावात कार्यक्रम असल्याने ते शनिवारी शेतात गेले नाहीत. बिबट्याने संधी साधत रविवारी पहाटे शेळ्यांवर हल्ला केला. दोन शेळ्यांना ऊसाच्या शेतात ओढून नेले. रविवारी कोळी हे शेतात परल्यानंतर त्यांचा हा प्रकार लक्षात आला. वनविभागाला कळविल्यानंतर त्यांनी सकाळी दहा वाजता शोध मोहिम राबविली. शेतात काही ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने वनविभागाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.बिबट्याने गेल्या वर्षी वरखेडे परिसरात मोठा धुमाकुळ घातला होता. त्याला ठार करण्यात आले असले तरी परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरवाड्यात बिबट्याने भऊर परिसरात गुरांवर हल्ले केल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :leopardबिबट्याJalgaonजळगाव