शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचे चार नगरसेवक अपात्र, घरकुल प्रकरणात शिक्षा भोवली

By सुनील पाटील | Updated: April 13, 2023 17:36 IST

दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही.

जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील गैरप्रकारामुळे शिक्षा झालेले नगरसेवक कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, लता रणजित भोईटे व भगत बालाणी या चार जणांना न्यायालयाने गुरुवारी अपात्र ठरविले. दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही. दरम्यान, आपण नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला असल्याने आपल्याला अपात्र घोषित करु नये असा बालाणी यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.पी.सैय्यद यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

शहरातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात या पाचही नगरसेवकांना पाच वर्षाची शिक्षा झालेली आहे. कायद्यानुसार दोन वर्ष शिक्षा झालेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. पदावर असेल तर त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र या नगरसेवकांनी निवडणूक लढवली. त्यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी लॉकडाऊनच्या आधी जळगावच्या दिवाणी न्यायालयात चौघांना अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली होती.

ॲड.सुधीर कुळकर्णी यांनी प्रशांत नाईक यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. बालाणी यांनी २९ मार्च रोजी राजीनामा दिलेला असला तरी नगरसेवक व गटनेता पदावर असताना अनेक निर्णय घेतलेले आहेत. महापालिकेत त्यांनी कामकाज केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टाळता येणार नसल्याचा युक्तीवाद ॲड.कुळकर्णी यांनी केला होता, त्यावर न्यायालयाने बालाणी यांचा अर्ज फेटाळून लावला होता.घरकुल घोटाळ्यात झालेल्या शिक्षेमुळे नगरसेवक पद जाण्याची शक्यता पाहता चौघांनी शिक्षेच्या निकालाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात केला होता. या न्यायालयाने चारही जणांचा अर्ज फेटाळून लावला होता.

सहा वर्ष निवडणूक लढविण्यास मनाई

न्या. एस.पी.सैय्यद यांनी निकाल देताना या चौघांना शिक्षेचा निकाल लागल्यापासून पुढील सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचे नमूद केले आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी हा निकाल लागला होता. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांना उभे राहता येणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव