शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चार दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:00 IST

शिवाजीनगर व कांचन नगरातील घटना

ठळक मुद्देतीन संशयित ‘सीसीटीव्ही’त कैदपोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा रहिवाशांचा आरोप, गुन्हा दाखल

जळगाव : शिवाजी नगर व कांचन नगर परिसरात एकाचवेळी मध्यरात्री चार दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला आहे. कांचननगरातील घटनेत गाडी जाळताना तीन तरुण सीसीटीव्ही कैद झाले आहे. शनिपेठ परिसरात एकाच ठिकाणी शंभर मीटरच्या परिसरात वाहने जाळण्याची ही चौथी घटना आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी शनी पेठ पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरात वारंवार घटनाशहरात दुचाकी, रिक्षा जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भरवस्तीत हे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असताना असे प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.दोन वेळा रिक्षाही जाळल्याकांचनगरात गुड्डू विजय हळदे याचीही रिक्षा १३ आॅक्टोबर रोजी जाळण्यात आली होती. हळने यांनी उदरनिर्वाचे साधन म्हणून नवीन रिक्षा घेतली होती. ते राजपूत राहत असलेल्या परिसरातच राहतात. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र घटनेला २ महिने उलटूनही संशयित मोकाट आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात खंडू चित्ते यांची दुचाकी जाळण्याची घटना घडली होती. घटनेला महिना उलटत नाही तोच ही घटना घडली.यापूर्वीही राजपूतच्या दुचाकीची छेडखानीयापूर्वी देखील विक्की राजपूत या तरुणाच्या दुचाकीच्या सीटवर ब्लेड मारणे, पेट्रोल चोरुन नेणे असा प्रकार उघडकीस आला आहे. परिसरात वाहने जाळल्याच्या घटनेमुळे राजपूत यांनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यात रविवारी पहाटे १ वाजून १४ मिनिटांनी तीन तरुण येतांना दिसत असून २ ते ५ मिनिटात त्यांनी दुचाकी पेटवून पळ काढल्याचे दिसून आले. तिन्ही जण हाफ पॅन्टवर घटानास्थळी आले. हे तरुण दुचाकीवर पेट्रोल ओततांना तसेच आगकाडीने दुचाकी पेटवितांना दिसून येत आहे.शेजारी रहात असलेले बँकेत नोकरीला असलेले वसंत वाणी यांच्या सीसीटीव्ही कॅमेºयात तीन तरुण कैद झाले आहेत.शिवाजीनगरात मध्यरात्री १२.१५ वाजता जाळल्या दुचाकीसलीम मजीद खान कुटुंबासह शिवाजीनगरात वासु-सपना कॉम्प्लेक्सजवळ वास्तव्यास आहेत. सलीम व जहाँगिर हे दोघे भाऊ मार्केटींग करतात. नेहमीप्रमाणे रविवारी दोघे सायंकाळी कामावरुन परतले. सलीम यांनी त्यांची दुचाकी (क्र एम.एच १९ डीसी८९८६) तसेच जहाँगिर यांनी त्याच्याजवळील दुचाकी (क्र एम.एच १९ सी के ६३८८) ही दुचाकी रस्त्यालगत अंगणात लावली होती. मध्यरात्री १२.१५ वाजता लोकांचा आरडाओरड करण्याचा आवाज आला असता, सलीम खान यांनी बाहेर येवून पाहिले त्यावेळी दोन्ही दुचाकी जळत होत्या. पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर दुचाकी पूर्ण जळून नुकसान झाले होेते. याप्रकरणी सलीम खान यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात ७१ हजार रुपयांच्या दुचाकी जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कांचन नगरात बापलेकाची दुचाकी जाळलीकांचनगरात सदगुरु किराणाजवळ ईश्वर नारायण राजपूत यांची दुचाकी (क्र.एम.एच १९ डीएस ८२७५) दुचाकी तर मुलगा विक्की राजपूत याची(क्र एम.एच १९ या दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सकाळी राजपूत यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच दुचाकी जाळणाºया कैद झाले आहे. याप्रकरणी ईश्वर राजपूत यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात ७० हजार रुपयाच्या दोन दुचाकी जाळणाºया अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव