शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मंगळवारपासून जळगाव शहरात चार वाढिव लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 11:36 PM

लसीकरण आढावा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जळगाव : कोराना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जळगाव शहरात चार शासकीय ...

लसीकरण आढावा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगाव : कोराना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जळगाव शहरात चार शासकीय लसीकरण केंद्र मंगळवार, ११ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

चार नवीन केंद्रजळगाव शहरात ११ मे पासून गणपती नगरातील स्वाध्याय भवन, मेहरूण परिसरात मुलतानी हॉस्पिटल या ठिकाणी १८ ते ४५ वयोगटाती व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच शनिपेठ येथील शाहीर अमर शेख दवाखाना, निमखेडी रस्त्यावरील कांताई नेत्रालय या ठिकाणी ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.१८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी कोविन पोर्टल, आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करणे व त्यानंतर वेळेसंबंधी व केंद्र संबंधित नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. केवळ नोंदणी करून व वेळेची नोंदणी न करता केंद्रावर प्रवेश मिळणार नाही, याविषयी देखील पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटासाठी ९ मे व अ१० मे या दोन दिवसात कोविशिल्डचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येणार आहे. मंगळवार, ११ मे पासून कोविशिल्डचा दुसरा डोस व पहिला डोस चे अनुक्रमे सत्ता ७०:३०  असे प्रमाण राहणार आहे.४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटाचे लसीकरण होत असलेल्या केंद्रावर उभ्या असलेल्या नागरिकांना उपलब्ध लसीइतके कुपन देण्यात येतील. त्याबाबत नोंदवहीत नोंदणी घेण्यात येऊन कुपन वाटपाचे दूरचित्रीकरण करण्यात येणार आहे.लसीकरणाचे या पद्धतीने नियोजन राहणार असून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव