शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध हवेसाठी केली एअर फिल्टरची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:20 IST

खगोल अभ्यासक सतीश पाटील यांचे संशोधन

ठळक मुद्दे सोप्या पद्धतीतून साकरले बहुमूल्य उपकरण

हितेंद्र कांळुखेजळगाव : गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. याच गरजेतून येथील खगोलशास्त्र अभ्यासक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी वाढत्या वायू प्रदुषणावर मात करण्यासाठी एअर फिल्टरची निर्मिती केली आहे....अशी झाली गरज निर्माणसतीश पाटील यांची मोटरसायकलवर देश भ्रमंती सुरु आहे. ही भ्रमंती टप्प्या टप्प्याने सुरु असून काही दिवस भ्रमंती व काही दिवस घरी येवून आराम असा त्यांचा हा उपक्रम आहे. नुकतेच ते औरंगाबादकडे गेले असताना रस्त्याचे काम सुरु असल्याने उडणारी धूळ आणि वाहनांच्या धुरातून सोडले जाणारे कार्बनडाय आॅक्साईडचे कण आणि काजळी यामुळे त्यांना खूपच त्रास झाला. यामुळे ते काही दिवस आजारी पडले. या प्रवासादरम्यान लावलेला सर्जीकल मास्क फारसा उपयोगी ठरला नाही, आणि यावर उपाय काय करता यईल? या विचारानेच एअर फिल्टरची निर्मिती होवू शकली.... असे तयार केले एअर फिल्टरएका डब्यात उच्च दाबाची हवा इलेक्टीक पंपाने सोडली जाते. या पंपासाठी ड्रायर मशिनचा वापर केला आहे. गरम हवेचे कॉईल यातून काढून टाकले आहे. हे ड्रायर बाहेरील हवा ओढून डब्यामध्ये सोडण्याचे काम करते.या डब्यात कागदाचे फिल्टर, कापूस, आणि खोबऱ्याचे तेल टाकलेले आहे. उच्च दाबाची हवा डब्यात येवून कागद व कापसावर आदळते व खोबरेल तेलामुळे धुळ व कार्बनडायआॅक्साईडचे कण कागद आणि कापसाला चिकटतात.हवा सहज बाहेर पडतेडब्यात शिरलेली हवा दुसºया नळीतून बाहेर पडते. ही नळी हेल्मेटला छिद्र पाडून तेथे जोडली असल्याने या नळी द्वारे हेल्मेटमध्ये शुद्ध हवा परसरते व सहज श्वास घेता येतो. श्वासाची हवा हेल्मेटच्या खालील पोकळीतून सहज बाहेर पडते. तसेच खोबरेल तेलाचा सुगंधीही मिळतो. यात घाण वाससुद्धा फिल्टर होतो.अवघ्या ७०० रुपयात झाले उपकरण तयारया एअर फिल्टरसाठी केवळ ७०० रुपये खर्च आला आहे. एअर फिल्टरचा एअर पंप हा मोटारसायकलच्या १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालतो. एअर फिल्टर सुरु करण्यासाठी हॅण्डलवर बटन बसवलेले आहे. गरज असेल तेव्हा एअर फिल्टर सुरु करता येते. यासाठी फुलमास्क हेल्मेट आवश्यक असते.पेटंट घेण्यास नकारयाचा वापर कोणीही करावा, अशी त्यांची इच्छा आहे. एवढेच नव्हे तर हे उपकरण कसे बनवायचे याचे मार्गदर्शनही ते मोफत करण्यास तयार आहे. दरम्यान याबाबतचे प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थांनाही आवाहन केले आहे.सर्जिकल मास्कपेक्षा एअर फिल्टर अधिक उपयुक्तसर्जिकल मास्कमुळे श्वास घ्यायला ताकद लागते. श्वास सोडलेली हवा बाहेर जाण्यासाठी खास सोय नाही. यामुळे मास्क जास्त वेळ राहिल्यास उच्छश्वासामुळे मास्क गरम होतो व जीवही गुदमरतो. एअर फिल्टर मध्ये मात्र ही अडचण नसून थंड आणि शुद्ध हवा मिळते व श्वासही सहज घेता येतो.