शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बामणोदजवळील अपघातात पाल येथील वनरक्षक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 14:50 IST

वनरक्षक दत्तात्रय जाधव हे पाल घरी परतत असताना बामणोद गावाजवळ भीषण अपघात होऊन त्यात ते जागीच ठार झाले.

ठळक मुद्देपाल येथून भुसावळला परतताना झाला अपघात शनिवारी मध्यरात्रीची घटना

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावल वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षक तथा सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय जाधव हे पाल ता.रावेर येथून भुसावळ येथे घरी परतत असताना त्यांचा बामणोद गावाजवळ भीषण अपघात होऊन त्यात ते जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडलीवनरक्षक दत्तात्रय जाधव पाल येथे नेमणुकीस होते. पाल येथून रात्री मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-२७१६) ने भुसावळ येथे आपल्या घरी जात होते. तेव्हा बामणोद गावाजवळील पेट्रोल पंपाच्या पुढे भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (क्रमांक एमएच-१९-बीजे-५०१३) ने जाधव यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की जाधव जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वनरक्षक जाधव यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला तर अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.या अपघातप्रकरणी किशोर जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि राहुल वाघ फौजदार रोहिदास ठोंबरे करीत आहे.वनरक्षक दत्तात्रय जाधव हे जामनेर मूळ रहिवासी असून ते भुसावळ येथे वास्तव्यास होते. ते भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस दीपक जाधव यांचे भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातFaizpurफैजपूर