शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीसाठी वनविभागाच्या जनजागृती चित्ररथाचे जळगावात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:40 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - वृक्षलागवडीसाठी जनजागृती चित्ररथाचे जळगाव येथे आगमन होऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या चित्ररथाचे स्वागत केले.शासनाच्यावतीने राज्यात येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत राज्यातील नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - वृक्षलागवडीसाठी जनजागृती चित्ररथाचे जळगाव येथे आगमन होऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या चित्ररथाचे स्वागत केले.शासनाच्यावतीने राज्यात येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत राज्यातील नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वन विभागाच्यावतीने चांदा (चंद्रपूर) ते बांदा, सावंतवाडी (सिंधुदूर्ग) वृक्ष लागवड जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे आगमन जळगाव शहरात झाले. यानिमित्ताने येथील काव्यरत्नावली चौकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चित्ररथाचे स्वागत केले. जिल्ह्यात १३ कोटी वृक्ष लागवड, हरीतसेना, महाराष्ट्र वनसंवर्धन इत्यादीबाबत जनजागृती होण्यासाठी या चित्ररथास हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यानंतर चित्ररथ मार्गस्थ झाला.याप्रसंगी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्यासह आमदार सुरेश भोळे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जळगावचे उप वनसंरक्षक डी. डब्लू, पगार, यावलचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, एस.आर. पाटील,, एन.ए. पाटील, एन.जी. पाटील, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक वाढई, सहायक वनसंरक्षक एस.एस. रनाळकर, हरितसेना मास्टर ट्रेनर प्रविण पाटील, राजेश जाधव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, हरित सेनेचे विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलJalgaonजळगाव