शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची सरपंचाबाबत जबरदस्तीने घोषणा; मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यक्रमातील प्रकार 

By सुनील पाटील | Updated: March 27, 2023 19:43 IST

शिवसेनेच्या शिंदे गटात सरपंच प्रवेशाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

जळगाव : तालुक्यातील वडली येथील सरपंच युवराज गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात जबरदस्तीने करण्यात आल्याचा प्रकार वावडदा येथे घडला आहे. सरपंचांनी तात्काळ पत्रक काढून याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वावडदा येथे रविवार दि.२६ रोजी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद‌्घाटन व शुभारंभाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी पंचक्रोशीतील सरपंचांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सरपंच या नात्याने मलाही आयोजकांनी निमंत्रित केले होते, त्यानुसार मी तेथे उपस्थित राहिलो. परिसरातील सरपंचांचा सत्कार समारंभ होत असताना त्यात माझाही सत्कार करण्यात आला व त्याच वेळी मी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. 

मुळात मी फक्त सरपंच या नात्याने कार्यक्रमाला उपस्थित होतो. मी शिंदे गटात प्रवेशच केलेला नाही. मला न विचारता अशी घोषणा करण्यात आली. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यावरुन मला मनस्ताप होत असून माझ्या एकनिष्ठतेवर शंका उपस्थित केली जात आहे. विश्वासाने कोणी कार्यक्रमाला जात असेल व तेथे असा विश्वासघात होत असेल तर कोणी कार्यक्रमांना उपस्थित राहिल का?. मी वडली गावाचा सरपंच आहे.  शिंदे गटाचा सदस्य देखील नाही. आम्ही पॅनल मिळून निवडणूक लढली आहे. शिंदे गटाचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यामुळेच त्यांनी हा खटाटोप केला आहे. मी माझ्या पॅनलशी एकनिष्ठ आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावGulabrao Patilगुलाबराव पाटील