शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 विद्यार्थी संख्यावाढीसाठी विभागप्रमुखांना शाळा दिली दत्तक, जळगावात मनपा शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा

By विजय.सैतवाल | Updated: March 10, 2023 20:21 IST

Jalgaon News: महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत.

- विजयकुमार सैतवालजळगाव : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित विभागप्रमुखांना शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागणार आहे. तसे आदेश मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले आहेत.

या संदर्भात आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरात विविध भागांमध्ये महानगरपालिका संचालित प्राथमिक शाळा असून त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात शाळेमधील स्वच्छता, स्वच्छतागृहाची व्यवस्था, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यासह शाळेस आणखी काय सुविधा पुरवू शकतो तसेच बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत समस्येबाबतच विद्यार्थी संख्यावाढ होण्यासाठी व अनुषांगिक इतर बाबींची पाहणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे प्रत्येकी एक शाळा दत्तक देण्यात येत असल्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. गायकवाड यांनी काढले आहेत.

आयुक्तांकडे द्यावा लागणार अहवालशाळांची जबाबदारी सोपवित मनपाच्या शाळांची यादी देत त्यासमोर विभागप्रमुखांचे नाव नोंदवून त्यांच्याकडे त्या-त्या शाळेची जबाबदारी सोपविली आहे. यानुसार आता आठवड्यातून एक वेळेस संबंधित विभागप्रमुखाने शाळेस भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधा व वर नमूद केलेल्या बाबींची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल आयुक्त व शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

....तर मुख्याध्यापक व विभागप्रमुखांवरही शिस्तभंगाची कारवाईसर्व संबंधित मुख्याध्यापकांनी पाहणी करण्यास आलेल्या विभागप्रमुखांना सहकार्य करावे, असेही आदेशात म्हटले आहे. जे मुख्याध्यापक सहकार्य करणार नाही व जे विभागप्रमुख याबाबत कार्यवाही करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही या आदेशाद्वारे दिला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण