शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच मनपाची पहिल्या दोन महिन्यात १६ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 16:35 IST

Jalgaon : महापालिकेकडून वसुलीची रक्कम वाढावी म्हणून दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना १० टक्के सवलत दिली जाते. तरी देखील महापालिकेची वसुली ही ८ कोटी रुपयांच्या वर जात नाही.

- अजय पाटील

जळगाव : महापालिकेची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर किंवा तत्कालीन नगरपालिका असतानाही जेवढी वसुली झाली नव्हती, तेवढी (तब्बल १६ कोटी) वसुली मनपाने यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच पहिल्यांदाच करून दाखवली आहे. महापालिकेने केलेली ही रेकॉर्डब्रेक वसुली असून, एप्रिल व मे महिन्यात महापालिकेची वसुलीचा आकडा ७ ते ८ कोटींपर्यंतच गेलेला असतो. विशेष म्हणजे महापालिकेने या दोन्ही महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना मालमत्ताकरावर १० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील झालेले रेकॉर्डब्रेक वसुली, अनेक वर्षांपासून आर्थिक संकटातून जात असलेल्या मनपाला ‘बुस्ट’देण्याचे काम करणार आहे.

महापालिकेकडून वसुलीची रक्कम वाढावी म्हणून दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना १० टक्के सवलत दिली जाते. तरी देखील महापालिकेची वसुली ही ८ कोटी रुपयांच्या वर जात नाही. मात्र, यंदा ही वसुली तब्बल १६ कोटींपर्यंत गेली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मनपाची वसुली दुपट्टीने वाढली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दोन महिन्यात एवढी वसुली झाल्यामुळे उर्वरित १० महिन्यात ही वसुली ८० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यातच ३१ मेपर्यंत जळगावकरांना मालमत्ताकरात १० टक्के सुट दिली जाणार असून, या चार दिवसात महापालिकेची वसुली दीड ते दोन कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असून, दोन महिन्यातील वसुलीची रक्कम १८ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

फेरमूल्यांकनामुळे वाढली रक्कममहापालिकेने गेल्या तीन वर्षांपासून शहरातील वाढीव मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले होते. यामध्ये महापालिकेच्या १९ हजारहून अधिक नवीन मालमत्ता आढळल्या, तर एकूण ८८ हजार मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तांमध्ये बदल केल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेने या वर्षांपासून मालमत्तांमध्ये वाढ करणाऱ्या मालमत्ताधारकांकडून वाढीव कराची वसुली सुरू केली असून, यामुळेच पहिल्या दोन महिन्यात मनपाची वसुली १६ कोटींपर्यंत पोहचली आहे. दरम्यान, महापालिकेच्या मालमत्ताकराची वर्षाची वसुलीदेखील ५२ कोटींपासून ८० ते ८५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असून, आता महापालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा देताना, कर्ज व आर्थिक परिस्थितीचे रडगाणे सुरू करू नये, असे मत सर्वसामान्य जळगावकरांकडून व्यक्त केले जात आहे.

गेल्या पाच वर्षातील एप्रिल व मे महिन्यात झालेली वसुलीवर्ष - झालेली वसुली२०१८ - ५ कोटी२०१९ - ६ कोटी२०२० - ००२०२१ - ८ कोटी२०२२ - १६ कोटी

प्रभाग समितीनिहाय झालेली वसुलीप्रभाग समिती १ - ५ कोटी ३७ लाख २१ हजारप्रभाग समिती २ - २ कोटी ४१ लाख ८१ हजारप्रभाग समिती ३ - ३ कोटी २८ लाख ५४ हजारप्रभाग समिती ४ - ४ कोटी ९६ लाख ८४ हजार

टॅग्स :Jalgaonजळगाव