जळगावातील नऊ हॉटेल्स देणार घरपोच ‘फूड’ पार्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:35 PM2020-03-27T12:35:40+5:302020-03-27T12:36:55+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ व इतर दुकाने बंद असल्याने या काळात ...

Food parcels to offer nine hotels in Jalgaon | जळगावातील नऊ हॉटेल्स देणार घरपोच ‘फूड’ पार्सल

जळगावातील नऊ हॉटेल्स देणार घरपोच ‘फूड’ पार्सल

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ व इतर दुकाने बंद असल्याने या काळात जळगाव शहरात नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरीता एकटे राहणाºया व्यक्ती व इतरांची जेवणाची सोय व्हावी यासाठी शहरातील नऊ हॉटेल, रेस्टॉरंटला पार्सल काऊंटरची परवानगी देण्यात आलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाºया उपाययोजनांमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या २१ मार्च २०२० च्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी व तत्सम प्रकारचे दुकाने २३ मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरात विविध कारणांमुळे राहणाºया मंडळींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही गरज ओळखून शहरातील नऊ हॉटेल्सला फूड पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या हॉटेल्स, रेस्टॉरंटची नावे, संपर्क क्रमांक व त्यांचा पत्ता
हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड (०२५७-२२३२८८८), हॉटेल मुरली मनोहर, आकाशवाणी चौक (०२५७-२२३४६९७), हॉटेल शालिमार, भास्कर मार्केट (०२५७-२२३३६३७), हॉटेल मुरली मनोहर, अजिंठा चौफुली (०२५७-२२४६७८), हॉटेल उत्तम भोज, चित्रा चौक (०२५७- २२२९७०१), हॉटेल गौरव, खेडी रोड (९८२३२४८३३३), हॉटेल जलसा बहिणाबाई उद्यान (९८२२१९५५५६), हॉटेल रसिका, मानसिंग मार्केट (९४२०३४८७५७), हॉटेल कॅफे चॅकोलेड, आदर्शनगर (९३७१३३३३७३) या ९ हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनाच फूड पार्सलची परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी दिली.

Web Title: Food parcels to offer nine hotels in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव