शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यात फसली गाडी अन् जनावरांची सुटका झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 16:09 IST

धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरून चारचाकी फसली आणि मंगरूळ येथील युवकांच्या प्रयत्नाने गुरांची सुटका झाली.

ठळक मुद्देयुवकांच्या सतर्कतेने गायींची सुटका.मंगरूळ-हेडावे, बहादरवाडी आणि निसर्डी येथील गुरे चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : तालुक्यातील निसर्डी , बहादरवाडी व हेडावे येथून गुरे कोंबून घेऊन जाणारी चारचाकी धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरून फसली आणि मंगरूळ येथील युवकांच्या प्रयत्नाने गुरांची सुटका झाली. वाहनचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दि. १४ रोजी सकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान (एमएच २३ एन ५५४१) हे वाहन मंगरूळ गावाजवळ धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला जाऊन फसले. वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, भटू बाविस्कर, भाजप युवा मोर्चाचे राकेश पाटील, मिलिंद पाटील, अनिल पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील हे धावत गेले असता त्यांना प्रवाशी चारचाकीत चार गायी कोंबलेल्या आढळून आल्या. लोकांची गर्दी जमते, ते पाहून चालक पळून गेला.मंगरुळच्या युवकांनी गायींची सुटका केली, तोपर्यंत हेडावे येथील गायीचे मालक गोकुळ धनजी पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्यांच्या गायी ओळखल्या आणि उर्वरित दोन गायी निसर्डी येथील विनोद मोतीलाल सोनवणे आणि बहादरवाडी येथील मनोहर युवराज पाटील यांच्या असल्याची ओळख पटली.पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, पोलीस योगेश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन गुरांना शिरूड गोशाळेत रवाना केले आणि वाहन पोलिस स्टेशनला जमा केले. गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला वाहनचालक विरुद्ध चोरीचा आणि गुरे कोंबल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरfour wheelerफोर व्हीलरcowगाय