वासरे व खेडी या दोन गावांकडून वाहत येणारा नाल्याचे कळमसरे गावाजवळ संगम होऊन हाच नाला पथराड नाला म्हणून तांदळी शिवारात पांझरा नदीस मिळतो. मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र खेडी व वासरे या गावाकडील नाल्याच्या उगमस्थळी जोरदार पर्जन्यवृृष्टी झाल्याने संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास कळमसरे संगमावर नाला दुथडी भरून वाहू लागला. गावात पाऊस झिमझिम व नाला मात्र अचानक ओव्हरफ्लो पाहून ग्रामस्थही सुखावले.
दरम्यान, फरशीपासून नाला अरुंद होत गेल्याने पुराचे पाणी अंगणवाडी इमारत, मरीआई देऊळ व आदिवासींच्या घरांना विळखा झाला. पहिल्या पुराच्या पाण्यात नालाकाठी खासगी वाहनधारकांनी आपली वाहने धुवायला सुरुवात केली.