दरोड्यातील आरोपीस पाच वर्षे कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:45 AM2019-01-23T00:45:36+5:302019-01-23T00:49:11+5:30

भाविकांंचे वाहनावर तुफान दगडफेक करून ते अडवून लुटमार करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने मंगळवारी ठोठावली. दुसºया आरोपीची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 Five-year imprisonment for riot accused | दरोड्यातील आरोपीस पाच वर्षे कारावासाची शिक्षा

दरोड्यातील आरोपीस पाच वर्षे कारावासाची शिक्षा

Next
ठळक मुद्देचुंचाळे येथील भाविक जात होते शेगावलादरोड्यातील इतर चार आरोपी अद्याप फरारच

चोपडा : चुंचाळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन अडवून तुफान दगडफेक आणि लूटमार करून चालकाला दुखापत केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील आरोपी राकेश उर्फ डुचक्या चंद्रकांत तडवी (वय २५ रा. जुडामोहडा) यास पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेसह तीन हजार रुपये दंड तर दुसरा आरोपी ठाणसिंग बुधा भिलाला (२५, रा.मोहाली ता.सेंधवा) याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही.पी.आव्हाड यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
२५ आॅगस्ट २०१७ रोजी गुरुदास भगवान पाटील (४२, रा.चुंचाळे ता.चोपडा) हे गावातील भाविकांना ऋषीपंचमी निमित्त शेगाव येथे घेऊन जात असतांना रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन्ही वाहनांवर दरोडेखोरांनी दगडफेक करून गाड्या अडविल्या, आणि चालक व भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडील ६५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल बळजबरीने काढून दुखापत केली होती. याबाबत गुरुदास पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पो.स्टे.ला गुरनं.९९/२०१७ भादंवि कलम ३९५, ४२७, ३४ अन्वये ठाणसिंग बुधा भिलाला, राकेश उर्फ डुचक्या चंद्रकांत तडवी, रमेश रुमसिंग भिल, भाईला तेरसिंग भिल, भाईदास चंद्रसिंग तडवी, भाईदास बाजº्या बारेला रा.चिलारीया ता.वरला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो. नि. किसनराव नजन पाटील, सपोनि सुजित ठाकरे, हे.कॉ.राजू महाजन, सुनील पाटील, प्रदीप राजपूत, रवींद्र जवागे, पो.कॉ.प्रकाश मथुरे यांनी तपास करून ठाणसिंग भिलाला व राकेश उर्फ डुचक्या चंद्रकांत तडवी यांना अटक केली होती. तर उर्वरित चार आरोपी अद्याप फरार आहेत.
दरोड्याचा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालला. यात फिर्यादी व इतरांच्या साक्षी होऊन राकेश उर्फ डुचक्या तडवी यास ३९५ कलमान्वये पाच वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच भादंवि ४२७ कलमान्वये एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दुसºयाची निर्दोष मुक्तता झाली.
 

Web Title:  Five-year imprisonment for riot accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा