शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जळगाव जिल्ह्यातील 5 गावांचा ‘ग्रामपरिवर्तन’ मध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:03 IST

अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी : जळगावात आदिवासी मित्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे थाटात वितरण

ठळक मुद्देराज्यातील निवडक 1 हजार गावांचा समावेशनंदुरबार जिल्ह्यातील 12 गावांचा समावेशपथदर्शक प्रकल्प राबवा

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 11 - मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रामपरिवर्तन’ या गावांच्या सर्वागिण विकासाच्या योजनेत जिल्ह्यातील 5 गावांचा प्रायोगिक तत्वावर समावेश करण्याची घोषणा राज्याचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी शुक्रवारी दुपारी कांताई सभागृहात लोकसंघर्ष मोर्चातर्फे आयोजित आदिवासी मित्र पुरस्कार सोहळ्यात बोलताना केली. परदेशी यांनाही जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते धरती आबा बिरसा मुंडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुरस्कारार्थ्ीसमावेतच कार्यक्रमाचे उद्घाटक सिनेअभिनेते यशपाल शर्मा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, यमुनाबाई, प्रकाश बारेला, मुकुंद सपकाळे, साजीदभाई, शंभू पाटील उपस्थित होते. धान्य बिजाची टोपली, सन्मानचिन्ह, मानपत्र व धनुष्यबाण असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रवीण परदेशी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ग्रामपरिवर्तन योजनेत राज्यातील निवडक 1 हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात एकही व्यक्ती बेघर नसेल. शेतक:यांचे उत्पन्न दुप्पट होईल, शैक्षणिकस्तर वाढेल, 100 टक्के साक्षरता होईल, यादृष्टीने सूक्ष्मनियोजन करून ग्रामसभा, तांत्रिक सल्लागार व ग्रामपरिवर्तन समिती मिळून 3 वर्षात ग्रामविकास साध्य करण्याचा प्रय} केला जाईल. त्यासाठी जिल्हास्तरावरील योजना त्याला जोडून जिल्हास्तरावर उपलब्ध निधी दिला जाईल. जो निधी कमी पडेल तो मुख्यमंत्रीस्तरावर महाराष्ट्र ग्राम फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल.

नंदुरबार जिल्ह्यातील 12 गावांचा या योजनेत आधीच समावेश झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील एकही गाव या योजनेत नाही. त्यामुळे आधी 5 गावांचा समावेश करून तेथे हा पथदर्शक प्रकल्प राबवावा,अशी सूचना त्यांनी केली. त्यासाठी सूक्ष्मनियोजन करण्याची सूचनाही जिल्हाधिका:यांना केली. यांनाही पुरस्कार प्रदानयावेळी नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना क्रांतीवीर ख्वाजा नाईक पुरस्कार, माजी मंत्री पद्माकर वळवी यांना आदिवासी र} पुरस्कार, माजी आमदार शिरीष चौधरी यांना वीर तंटय़ा भिल्ल पुरस्कार,तर डॉ.विजया अहिरराव व प्रतिभा शर्मा यांना आदिवासी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरीष चौधरी यांच्यावतीने त्यांच्या प}ी अरूणा चौधरी यांनी पुरस्कार स्विकारला. कलशेट्टी यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, कोयता तर वळवी यांना धनुष्यबाण, मानपत्रक, सन्मानचिन्ह व कोयता देण्यात आला. अन्य पुरस्कारार्थ्ीनाही सन्मानचिन्ह, मानपत्र कोयता असा पुरस्कार देण्यात आला.