पाचोरा तालुक्यातील खून प्रकरणात पाच जण निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:48 PM2018-03-09T12:48:26+5:302018-03-09T12:48:26+5:30

जबानीतील तफावती, अविश्वासार्हता व तपास कामातील त्रुटी आदी बाबींचा विचार होऊन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली

Five people were innocent in Paurora taluka murder case | पाचोरा तालुक्यातील खून प्रकरणात पाच जण निर्दोष

पाचोरा तालुक्यातील खून प्रकरणात पाच जण निर्दोष

googlenewsNext
ठळक मुद्देप्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केली निर्दोष मुक्ततामयत नाना पाटील व अनिल पवार यांच्यात भांडण होत असे

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - बाळद बु, ता. पाचोरा येथील नाना रामदास पाटील यांच्या खून प्रकरणात सुरेश काळु पवार, अनिल ओंकार पवार, जयकुमार अनिल पवार, मयुर अनिल पवार व शशिकांत सुरेश पवार या पाच जणांची प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत माहिती अशी की, मयत नाना पाटील व अनिल पवार यांच्यात भांडण होत असे. त्यामुळे कंटाळून नाना ते घर सोडुन दुसरीकडे राहायला गेले होते. त्यावरून नाना पाटीलला, तुला सोडणार नाही तुझा बदला घेऊ अशी धमकी दिली होती. हा खटला न्या.कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात चालला. दहा साक्षीदार तपासण्यात आले. जबानीतील तफावती, अविश्वासार्हता व तपास कामातील त्रुटी आदी बाबींचा विचार होऊन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अ‍ॅड. वसंत आर. ढाके व अ‍ॅड. भारती ढाके यांनी काम पाहिले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

Web Title: Five people were innocent in Paurora taluka murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.