शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:06 IST

जामनेर तालुक्यासह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या शस्त्रधारी टोळीला रविवारी रात्री जेरबंद करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांनी केली चोरीची दुचाकी जप्तआरोपींकडून गावठी कट्टा व काडतूस, हत्यार जप्तपळून जाण्याच्या प्रयत्नातील एका आरोपीला पकडले

जामनेर : तालुक्यासह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या शस्त्रधारी टोळीला रविवारी रात्री जेरबंद करण्यात आले. टोळीतील पाचही आरोपी कडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, ९ मोबाईल, सिमकार्ड, चॉपर, तीन मोटरसायकलसह दरोड्यात लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक, येथे नेरी पहूर रस्त्यावर खोडपे पेट्रोल पंपाच्या पुढे चार ते पाच अज्ञात इसम संशयास्पदरित्या फिरत आहे त्यांच्याजवळ हत्यार असल्याची गुप्त माहिती नेरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांना रविवारी रात्री मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या सुचनेवरून उपनिरीक्षक विकास पाटील, तुषार पाटील, सचिन चौधरी, सचिन पाटील,विनोद पाटील, योगेश महाजन, राहुल पाटील, मनोज धनगर हे तातडीने रवाना झाले. अतिशय शिताफीने सापळा रचून त्यांनी ५ संशयीतांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.पोलिसांनी अमोल गोकुळ पाटील (वय २५ रा.मोहाडी ता.जामनेर), सलमान अहमदखान (वय २१ रा. ताबांपुरा जळगावं), आरीफ जंहागीर देशमुख (वय २१ रा. रामनगर जळगांव), सय्यद सलमान सय्यद कासिम (वय २४ रा. महादेव मंदिर जळगाव) याच्यासह एक अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन पाटील यांची फिर्यादीवरून भादवी कलम ३९९, ४०२ सह ३/२५, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर