जळगाव :तालुक्यातील उमाळा येथे तलावात बुडून हिरामण ओंकार बाबर (६०, रा.उमाळा) यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत जगन रामा भिल (३२, रा.शिरसोली) या तरुणाचाही ४ रोज दुपारी ४ वाजता शिरसोली येथे जळके फाट्याजवळ मृत्यू झाला. त्याचे कारण समजू शकले नाही. याच जागेवर ३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता तिफायत बशीर पिंजारी (५८) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. राजू हरी डुलसुधीर (५७, रा.पहूर, ता.जामनेर) यांचा ४ रोजी दुपारी ३.३० वाजता खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वसंत रघुनाथ वाघ (७६, रा.रामेश्वर कॉलनी) यांचाही ४ रोजी दुपारी अडीच वाजता मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. या सर्व घटनांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या घटनेत पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 13:04 IST